News Flash

Japan Earthquake: जपानच्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या किनारपट्टीवर त्सुनामी

जपानमध्ये मंगळवारी ६.९ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला.

Japan earthquake : राजधानी टोकियोपर्यंत जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र फुकूशिमा किनाऱ्याजवळच्या समुद्रात १० किलोमीटर खोलीवर होते.

जपानमध्ये मंगळवारी झालेल्या भूकंपानंतर फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा येऊन धडकल्या. या लाटा तब्बल १ मीटर इतक्या उंचीच्या असल्याची माहिती टोकियो ऊर्जा प्रकल्पातील अधिकाऱ्याने दिली. जपानमध्ये मंगळवारी ६.९ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. भूकंपानंतर जगभरातील हवामान खात्यांकडून उत्तर जपानच्या किनारपट्यांवर त्सुनामी येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३८ मिनिटांनी फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या किनारपट्टीला त्सुनामीचा तडाखा बसला. दरम्यान, त्सुनामीच्या या लाटांमुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही.

आज पहाटे ५.५९ मिनिटांनी भूंकपाचा हा धक्का बसला. राजधानी टोकियोपर्यंत जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र फुकूशिमा किनाऱ्याजवळच्या समुद्रात १० किलोमीटर खोलीवर होते. त्यामुळे भूकंपानंतर टोहोकू कंपनीकडून फुकूशिमा येथे विजनिर्मिती करणाऱ्या अणुऊर्जा केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या टीव्ही फुटेजेसमध्ये फुकुशिमा किनाऱ्यावरील जहाजे या भूकंपानंतर पाण्यावर हेलकावे खाताना दिसली. सुरूवातीला हवामान खात्याकडून ३ मीटरपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याचा इशारा देण्यात आला होता. २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर फुकुशिमा येथे अणुभट्टीचा स्फोट झाला होता. त्यावेळी तब्बल १२ फूट उंचीच्या लाटांनी फुकुशिमाच्या किनारपट्टील झोडपले होते. यावेळी दोन अणुभट्ट्यांचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 7:43 am

Web Title: japan earthquake 1 metre tsunami hits coast at fukushima nuclear plant
Next Stories
1 आता चलनउपायांची रांग!
2 ‘मोदींच्या दहशतीने भाजप खासदार गप्प’
3 सव्वा लाख रिक्त पदे रेल्वे अपघातांच्या मुळाशी
Just Now!
X