03 March 2021

News Flash

…म्हणून जपानने नियुक्त केला Minister of Loneliness; जाणून घ्या हा मंत्री नक्की काय काम करणार

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी केली नियुक्तीची घोषणा

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

जपान सरकारने मिनिस्टर ऑफ लोलीनेस म्हणजेच एकटेपणावर काम करण्यासाठी विशेष मंत्र्याची नेमणूक केली आहे. देशातील नागरिकांमध्ये एकटेपणाची आणि समाजापासून दूरवल्याची भावना वाढत असल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच जपान सरकारने ही विशेष नियुक्त केल्याचे जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी तेत्सुशी साकामोतो यांनी मिनिस्टर ऑफ लोलीनेस म्हणून नियुक्ती केलीय. साकामोते हे यापूर्वीच जपानमधील जन्मदर कमी होत असल्यासंदर्भातील समस्येवर काम करत आहेत. आता ते देशामधील नागरिकांमध्ये असणारा एकटेपणा आणि तो संपवण्यासाठी तसेच आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील काम करणार आहेत. सप्टेंबरमध्ये सुगा हे पहिल्यांदा राष्ट्रपती झाले तेव्हा साकामोतो यांना आर्थिक विषयासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र १२ फेब्रुवारी रोजी साकामोतो यांच्यावर देशातील जनतेमध्ये वाढणाऱ्या नवीन समस्येवर उत्तर शोधण्याची नवीन जबाबदारी टाकत असल्याची घोषणा सुगा यांनी केली. “पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एकटेपणाची भावना अधिक आहे. देशामध्ये आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही अडचणीचे मूळ शोधून काढाल आणि त्यावर कशापद्धतीने मात करता येईल यासंदर्भातील धोरणे तयार करण्यासाठी मदत कराल,” असं सुगा यांनी साकामोतो यांची नियुक्ती करताना प्रसारमाध्यमांसमोर म्हटलं आहे.

एकटेपणा सर्वात मोठ्या समस्यांपैकी…

एकटेपणा हा जपानमधील आरोग्यविषय समस्यांपैकी सर्वात महत्वाचा आणि गहण प्रश्न असल्याचे मानले जाते. येथील लोकं अनेकदा एकट राहण्याला प्राधान्य देतात त्यामधून एकटेपणा वाढतो आणि नंतर तो जीवघेणा ठरतो. जपानमध्ये यापूर्वी या एकटेपणाच्या समस्येवर उपाय म्हणून अगदी हात पकडून चालणाऱ्या रोबोट पाहून ते काहीही न करण्यासाठी केवळ तुमची सोबत करण्यासाठी व्यक्ती नियुक्त करण्यापर्यंत अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जपानचे लोलीनेस मिस्टीर म्हणझेच साकामोतो हे परिषद घेणार असून एकटेपणाचा समाना करणाऱ्यांना कोणत्या अडचणी आहेत आणि त्यावर काय करता येईल यासंदर्भात चर्चा करणार आहे. “एकटेपणा घालवण्यासाठी आणि लोकांनी समाजापासून दूर राहू नये यासाठी मी प्रयत्न करेन,” असं साकामोतो यांनी म्हटलं आहे.

(फोटो सौजन्य: रॉयटर्स)

आत्महत्या वाढल्या…

करोना साथीच्या काळामध्ये जपानमधील आत्महत्यांचे प्रमाण ११ वर्षांमध्ये पहिल्यांदाच वाढल्याचे पहायला मिळालं. २०२० साली ऑक्टोबरमध्ये तर जपानमध्ये करोनापेक्षा आत्महत्या केल्याने अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये दोन हजार १५३ जणांनी आत्महत्या केली तर एक हजार ७६५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता असं जपानमधील राष्ट्रीय पोलीस यंत्रणेच्या आकडेवारीमधून स्पष्ट होतं आहे. एकटेपणामुळे हृयविकाराचा त्रास, विसरभोळेपणा आणि खाण्यासंदर्भातील आजार उद्भवतात असं अनेक अभ्यासांमधून समोर आळं आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. जपानमध्ये ऑक्टोबर महिन्यात ८७९ महिलांनी आत्महत्या केली. मागील वर्षीच्या म्हणजेच २०१९ च्या आखडेवारीपेक्षा ही संख्या ७० टक्क्यांनी अधिक आहे.

महिलांमध्ये निराशा जास्त कारण…

जपानमध्ये अविवाहित महिला एकट्याच राहतात. मात्र या महिलांना सर्व सुखसोयी असणारा निवारा आणि इतर गोष्टी मनासारख्या मिळत नाहीत आणि त्यामुळे नैराश्य येतं असं जपानमधील प्राध्यापक असणाऱ्या मिचिको युईडा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पहिल्यांदा या देशाने नेमला मिनिस्टर ऑफ लोलीनेस 

२०१८ साली युनायटेड किंग्डमने पहिल्यांदा लोलीनेस मिनीस्टरची नियुक्ती केली होती. युनायटेड किंग्डममधील लोकांमध्ये एकटेपणाची भावना वाढल्याने यासमस्येवर काम करण्यासाठी या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आलेली. मागील तीन वर्षात युकेमध्ये तीन लोलीनेस मिनिस्टर होऊन गेले आहेत. ऑस्ट्रेलियाही अशाप्रकारचे मंत्रीपद निर्माण करण्याचा विचार करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 4:37 pm

Web Title: japan has appointed a minister of loneliness after seeing suicide rates in the country increase for the first time in 11 years scsg 91
Next Stories
1 सीमेवर रक्तरंजित संघर्ष पण २०२० मध्ये व्यापारात चीनच भारताचा सर्वात मोठा भागीदार
2 Breaking : टूलकिट प्रकरण; दिशा रवीला न्यायालयाकडून मोठा दिलासा
3 पाच राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करात केली कपात; ‘या’ राज्यात सात रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल
Just Now!
X