23 November 2017

News Flash

अहमदाबादमध्ये गळाभेटीनंतर मोदी- शिंजो अाबेंचा रोड शो

मुंबई- अहमदाबाद या देशातील पहिल्या व महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करणार

अहमदाबाद | Updated: September 13, 2017 5:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे

जपानचे पंतप्रधान शिंजो अाबे यांचे बुधवारी दुपारी भारतात आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर शिंजो अाबे यांचे स्वागत केले. शिंजो अाबे यांची गळाभेट घेत मोदींनी त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी रोड शो केला.

मुंबई- अहमदाबाद या देशातील पहिल्या व महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ गुजरातमधून केला जाणार आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अाबे हे आजपासून (बुधवारी) भारत दौऱ्यावर आले असून या दौऱ्यात ते नरेंद्र मोदी यांच्या समवेत अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. जपानच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाची किंमत १.८ लाख कोटी रुपये आहे. हा प्रकल्प ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याशिवाय अन्य दहा सामंजस्य करारांवरही मोदी- आबे भेटीत स्वाक्षऱ्या होतील.

शिंजो आबे यांच्यासह त्यांची पत्नीदेखील भारतात आली आहे. नरेंद्र मोदी, आबे आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावरुन साबरमती आश्रमापर्यंत रोड शो केला. आबे यांच्या पत्नीचा भारतीय पेहराव बघून सारेच आश्चर्यचकीत झाले. रस्त्याच्या दुतर्फा स्थानिकांनी गर्दी झाली होती. रोड शोच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यानंतर साबरमती आश्रमात त्यांनी महात्मा गांधी यांनी आदरांजली अर्पण केली.

 

First Published on September 13, 2017 5:12 pm

Web Title: japan pm shinzo abe in india gujarat visit updates first lady meet pm narendra modi ahmedabad bullet train
टॅग India,PM Shinzo Abe