टोक्यो आणि आसपासच्या भागांसाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आणीबाणी घोषित केली आहे. टोक्यो आणि आसपासच्या भागांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. टाइम वेबसाइटने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालच शिंजो आबे आणीबाणी जाहीर करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सात एप्रिलपासून महिन्याभरासाठी ही आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ओसाका, कानागावा, चिबा, साईतामा, ह्योगो, फ्युक्युओका आणि टोक्योमध्ये आणीबाणी घोषित केली आहे.

आणीबाणीमुळे करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरील सरकारला आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले आहेत. करोना व्हायरस टास्क फोर्सच्या बैठकीत आबे यांनी हा निर्णय जाहीर केला. “तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण परस्परांशी ७० ते ८० टक्के संपर्क कमी केला तर दोन आठवडयात करोनाचा फैलाव कमी होईल” असे आबे म्हणाले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आबे यांनी आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. जपानमध्ये सध्या करोनाचे ४५६३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डायमंड प्रिंसेस जहाजावरील ७०० प्रवाशांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japans prime minister abe declares coronavirus state of emergency around tokyo dmp
First published on: 07-04-2020 at 15:36 IST