जाट आरक्षण आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आंतरजातीय हिंसाचार होता आणि त्यामध्ये चार बिगर जाट मृत्युमुखी पडले. झज्जरमधील शवागारातील नोंदीनुसार, हिंसाचारात दोन साइनीस, एक कुंभार, एक हलवाई आणि तीन जाट मृत्युमुखी पडल्याचे म्हटले असून पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार राज्यात फूट पडली आहे. झज्जरमधील सवानी मोहल्ल्यातील सहा दुकानांपैकी श्री ओम हुडा इलेक्ट्रिकल्स हे जाट व्यक्तीचे दुकान हिंसाचारात शाबूत राहिले, अन्य पाच दुकानांना जाटांनी आग लावली त्यामध्ये साइनीस आणि नाइस जातीच्या व्यक्तींची दुकाने होती, सायनीस आणि पंजाबी लोकांची दुकाने शनिवारी जाळण्यात आली. हरयाणा बुक डेपो हे जाट व्यक्तीचे दुकान सहीसलामत राहिले.झज्जरच्या सिव्हिल रुग्णालयात आतापर्यंत सात जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. दी इंडियन एक्स्प्रेसने या नोंदीची पाहणी केली तेव्हा त्यामध्ये दोन साइनीस, एक कुंभार, एक हलवाई आणि उर्वरित तीन जण जाट असल्याचे म्हटले आहे. आता जाट आरक्षण आंदोलनाने हिंसक जातीय वळण घेतल्याचे झज्जरचे पोलीस अधीक्षक सुमितकुमार यांनी म्हटले आहे.

‘अ‍ॅम्नेस्टी’ला चिंता
लंडन : भारतातील प्रशासन धार्मिक हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले असून अनेक वेळा प्रक्षोभक भाषणांतून जातीय विद्वेष पसरवण्यात आला. पत्रकार, लेखक, कलाकार व मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यावर हल्ले करण्यात आले तेही सरकारला रोखता आले नाहीत, अशी टीका अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात केली आहे. लंडन येथील या संस्थेच्या २०१५-१६ च्या अहवालात भारतात स्वातंत्र्यावर बंधने असल्याचे म्हटले आहे.