News Flash

दिल्लीचे पाणी रोखण्याचा इशारा

सरकारी नोकऱ्यांमध्ये जाट समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य न केल्यास दिल्लीला होणारा पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा गेले दहा दिवस आंदोलन करीत असलेल्या

| March 17, 2013 12:01 pm

सरकारी नोकऱ्यांमध्ये जाट समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य न केल्यास दिल्लीला  होणारा पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा गेले दहा दिवस आंदोलन करीत असलेल्या अखिल भारतीय जाट आरक्षण समितीने शनिवारी दिला.  जाट आरक्षण समितीने मोरादाबाद जिल्ह्य़ातून जाणारी पाण्याची पाइपलाइन फोडण्याचा इशारा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधीक्षक नितीन तिवारी यांनी सांगितले की, कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पाण्याच्या पाइपलाइनला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी तणावग्रस्त भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:01 pm

Web Title: jats threaten to stop drinking water supply to delhi stir on
Next Stories
1 बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, नितीशकुमार यांची मागणी
2 मध्य प्रदेशात परदेशी महिलेवर सामुहिक बलात्कार
3 सीआरपीएफ कॅम्प हल्ला: दहशतवाद्यांना अश्रय देणाऱयाला अटक
Just Now!
X