22 March 2019

News Flash

गोमांस खाणारे जवाहर नेहरू ‘पंडित’ नव्हेच: भाजपा आमदार

मी ७८ वर्षांचा आहे. मला अजूनही नीट आठवतं की राहुल गांधी कधीही इंदिरा गांधींसोबत देवळात गेले नव्हते.

संग्रहित छायाचित्र

जवाहरलाल नेहरू हे पंडित नव्हते. जे नेहरू गोमांस खायचे ते कधीच पंडित असू शकत नाही, असे वादग्रस्त विधान भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केले आहे. राहुल गांधी कधी इंदिरा गांधींसोबत मंदिरात गेले होते का?, काँग्रेस नेत्यांनी हे सिद्ध करावे, मी पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे आव्हानच त्यांनी दिले.

भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी शुक्रवारी काँग्रेसवर टीका केली. मात्र, टीका करताना त्यांचा तोल गेला. जवाहरलाल नेहरू हे कधीच पंडित नव्हते. ते गोमांस खायचे. गोमांस खाणारा व्यक्ती पंडित असूच शकत नाही, असे बेताल विधान त्यांनी केले.

राहुल गांधी हे राजस्थान दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ते राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये जाणार आहे. यावरुन भाजपाने राहुल गांधींवर टीका केली होती. भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटले होते की, राहुल गांधींना आजी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याकडून देवळात जाण्याची शिकवण मिळाली.

सचिन पायलट यांच्या या विधानाचाही अहुजा यांनी समाचार घेतला. ‘मी ७८ वर्षांचा आहे. मला अजूनही नीट आठवतं की राहुल गांधी कधीही इंदिरा गांधींसोबत देवळात गेले नव्हते. माझा हा दावा खोटा असल्याचे सचिन पायलट किंवा अन्य काँग्रेस नेत्यांनी सिद्ध करावे, मी पदाचा राजीनामा देईन, असे आव्हानच त्यांनी दिले.

First Published on August 11, 2018 7:48 am

Web Title: jawaharlal nehru was not a pandit he beef says bjp mla gyan dev ahuja