25 February 2021

News Flash

Video: ‘सुनो गौर से दुनिया वालों…’ गाण्यावर जवानांचा जल्लोष!

छावणीतील जवानांमध्येही गुरुवारी उत्साह पहायला मिळाला.

सर्जिकल स्ट्राईकनंतर लष्करी छावणीत जल्लोषाचे वातावरण दिसले. ( छायासौजन्य एएनआय वृत्तसंस्था)

उरी हल्ल्यानंतर लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीच घुसून केलेल्या कारवाईनंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. लष्कराने चार तासात केलेल्या शौर्याची चर्चा आज सोशल मिडियावर देखील पहायला मिळाली. राजकीय वर्तुळात देखील एकमेकांविरोधात टीका करणारे नेते एकाच सुरात लष्करी कारवाईचे कौतुक करताना दिसले. देशभरात असणारे उत्सवाचे वातावर लष्करी छावण्यामध्ये देखील दिसून आले. छत्तीसगडमधील जगदलपूर छावणीतील जवानांमध्ये असाच उत्साह पहायला मिळाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे सुट्टी रद्द झाल्याची कोणतीही चिंता या जवानांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. सर्जिकल स्ट्राईक कारवाईनंतर ‘सुनो गौर से दुनिया वालों..बुरी नजर ना हम पे डालो…’ या गाण्याच्या तालावर लष्करी कारवाईचा आनंद जवानांनी साजरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 12:00 am

Web Title: jawans celebrate surgicalstrike in jagdalpur
Next Stories
1 ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या आनंदात हॉटेलने दिली बर्गरवर २० टक्के सूट
2 Viral video : माणुसकी जपणारी टेनिसपटू राफेल नदालची अनोखी ‘सर्व्हिस’
3 मातृत्वाची जबाबदारी निभावून ‘ती’ उतरते मैदानावर
Just Now!
X