21 October 2020

News Flash

#HyderabadEncounter : देर आए, दुरुस्त आए- जया बच्चन

आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे, अशा शब्दांत जया बच्चन यांनी संसदेत संताप व्यक्त केला होता. 

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांनी बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. यावर समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी ‘देर आए दुरुस्त आए’ असं म्हणत पोलिसांचं कौतुक केलं आहे.

‘बहुत देर आए..’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘एनएआय’ला दिली. हैदराबाद बलात्कार घटनेनंतर त्याचे पडसाद संसदेतही उमटले होते. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे, अशा शब्दांत जया बच्चन यांनी त्यावेळी संताप व्यक्त केला होता. “निर्भया असो, कठुआ असो किंवा मग हैदराबादमध्ये घटलेली घटना असो, आता लोकांना सरकारकडून योग्य आणि निश्चित उत्तर हवंय. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी संसदेत दिली होती.

आणखी वाचा : ‘ये नया हिंदुस्थान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी’; सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव

नेमकं काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं, अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 2:17 pm

Web Title: jaya bachchan on accused in the rape and murder of the woman veterinarian in telangana killed in an encounter ssv 92
Next Stories
1 #HyderabadEncounter: एन्काऊंटरचा तपास झाला पाहिजे – ओवैसी
2 “कायद्याच्या रक्षकांचा समाजातील राक्षसांवर विजय”
3 #HyderabadEncounter: महिलांनी पोलिसांना राखी बांधत केलं सेलिब्रेशन
Just Now!
X