News Flash

मुख्यमंत्रीपद स्वीकारताच दारूची ५०० दुकाने बंद करण्याचा जयललितांचा निर्णय

जयललिता यांनी सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जयललिता यांनी दारूविक्रीला हळूहळू आळा घातला जाईल, असे आश्वासन दिले होते.

अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता सोमवारी सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मुख्यमंत्रीपदाची धुरा हातात घेतल्यावर जयललिता यांनी राज्यातील ५०० दारुची दुकाने बंद करण्याचा आणि दारू विक्रीची वेळ दोन तासांने कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जयललिता यांनी दारूविक्रीला हळूहळू आळा घातला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी शपथविधीनंतर पहिलाच निर्णय दारूविक्रीची ५०० दुकाने बंद करण्याचा घेतला.
तामिळनाडूमध्ये आता दारूची दुकाने दुपारी १२ ते रात्री १० याच वेळेत सुरू राहणार आहेत. आतापर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत दारूची दुकाने सुरू ठेवायला परवानगी होती. मात्र, दारू विक्रीची वेळ दोन तासांनी कमी केल्यामुळे आता दुपारी १२ नंतरच दुकाने उघडता येणार आहेत. केवळ १० तासच ही दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. त्याचबरोबर दारू विक्रीची ५०० दुकानेही बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे या दुकानांची संख्या ६२२० पर्यंत खाली येणार आहे.
जयललिता यांनी सोमवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. रोशय्या यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्याशिवाय एकूण २८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ यावेळी देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2016 3:59 pm

Web Title: jayalalithaa closes 500 liquor shops
टॅग : Jayalalithaa
Next Stories
1 VIDEO : संरक्षक भिंत ओलांडून मद्यधुंद व्यक्ती सिंहिणीच्या भेटीला
2 Chabahar port: चाबहार बंदर विकासासाठी भारत, इराणमध्ये ऐतिहासिक करार
3 ओम उच्चारणात काही गैर नाही – सलमा अन्सारी
Just Now!
X