News Flash

‘…म्हणून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना आयसीसीयूमध्ये ठेवले आहे’

जयललिता यांची रोगप्रतिकारक क्षमता तुलनेने खूपच कमी झाली आहे.

Jayalalithaa : चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात उपचार सुरू असताना ५ डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले होते. त्यानंतर मरिना बीच येथे त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले होते.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता ‘फिट’ आहेत. पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत त्यांना आयसीसीयूमध्ये ठेवण्यात येणार आहे. जयललिता यांची रोगप्रतिकारक क्षमता तुलनेने खूपच कमी असल्याने त्यांना आयसीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती चेन्नईतील अपोलो रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी दिली.

मुख्यमंत्री जयललिता ह्या व्हेंटीलेटरशिवाय राहू शकतात. पण त्यांच्या फुफ्फुसाच्या स्थितीचा विचार करता त्यांना व्हेंटीलेटरवरून काढण्यात आले नाही, असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. आमचे प्रयत्न आणि लोकांच्या प्रार्थनेमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे, असे आम्ही खात्रीपूर्वक म्हणू शकतो. त्यांना अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जयललिता अन्नाचे सेवन व्यवस्थितरित्या करत असून, त्या बोलूही लागल्या आहेत. त्यांच्या शरिराच्या गरजेनुसार, त्यांना हाय प्रोटीन डाएटवर ठेवण्यात आले आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, जयललिता यांना ताप आल्याने २२ सप्टेंबरला चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 5:19 pm

Web Title: jayalalithaa continues to be in iccu says chennai apollo hospitals
Next Stories
1 नोटाबंदीविरोधातील याचिकांची सुनावणी स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
2 नोटबंदीच्या निर्णयात काहीच ‘शौर्य’ नाही, अरुण शौरींचा मोदींवर निशाणा
3 लॉकर आणि दागिने जप्त करण्याचा कोणताही विचार नाही – केंद्र सरकार
Just Now!
X