30 March 2020

News Flash

जयंत सिन्हांविरोधात ऑनलाइन याचिका, राहुल गांधींकडून पाठिंब्याचे आवाहन

हत्येप्रकरणातील दोषींचा सत्कार केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर सिन्हांचा हॉवर्डचे माजी विद्यार्थी हा दर्जा काढण्याचे अपील करण्यात आले

झारखंडमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्यांचा सत्कार केल्याप्रकरणी टीकेचे धनी बनलेल्या केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांच्याविरोधात आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही उतरले आहेत.

झारखंडमध्ये गोरक्षणाच्या नावाखाली व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्यांचा सत्कार केल्याप्रकरणी टीकेचे धनी बनलेल्या केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांच्याविरोधात आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही उतरले आहेत. हॉवर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले जयंत सिन्हा यांचा माजी विद्यार्थी हा दर्जा काढण्याची मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेसाठी राहुल गांधींनी ट्विट करून लोकांना समर्थन मागितले आहे.

एक सुशिक्षित खासदार आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांचा हत्येप्रकरणातील दोषी गुन्हेगारांचा सन्मान करतानाचे छायाचित्र पाहिल्यानंतर घृणा उत्पन्न होत असेल. तर या लिंकवर क्लिक करून या याचिकेला समर्थन द्या, असे आवाहन राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.

जयंत सिन्हा यांनी हत्येप्रकरणातील दोषींचा सत्कार केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर अमेरिकेतील प्रतिष्ठित हॉवर्ड विद्यापीठाचा एका विद्यार्थी प्रतीक याने ऑनलाइन याचिका सुरू केली होती. यामध्ये जयंत सिन्हा यांचा हॉवर्डचे माजी विद्यार्थी हा दर्जा काढण्याचे अपील करण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो, माजी माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला आणि इतर ४१ माजी नोकरशाहंनी मोदी सरकारला पत्र लिहून जयंत सिन्हा यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली आहे.

मी या लोकांचा सन्मान केला आहे. पण त्यांच्या कामाचे समर्थन करत नाही. लोकांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी न्यायालयाचा जामीन आदेश पाहावा. मी स्पष्ट करू इच्छितो की मी त्यांच्या कृतीचे समर्थन करत नाही. माझा पूर्वइतिहास स्वच्छ आहे. माझा हेतूही स्पष्ट आहे. मी त्यांच्या कृतीबरोबर नाही, असे जयंत सिन्हा यांनी आपली बाजू मांडताना म्हटले होते.

२९ जून २०१७ मध्ये झारखंडमधील रामगड येथे जमावाने मांस व्यापारी अलिमुद्दीन अन्सारीची बेदम मारहाण केली होती. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ११ लोकांना आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील ८ जण सध्या जामिनावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2018 8:59 pm

Web Title: jayant sinha lynching criminal felicitation rahul gandhi online petition harvard university
Next Stories
1 जपानमध्ये पावसाचे थैमान, १५६ जणांचा मृत्यू
2 ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये आंध्र प्रदेश प्रथम, महाराष्ट्र १३ व्या स्थानी
3 आगामी निवडणुकीनंतर सुषमा स्वराज, राजनाथ सिंह भाजपाच्या मार्गदर्शक मंडळात: यशवंत सिन्हा
Just Now!
X