News Flash

कर्नाटकात नवे नाट्य, जेडीएसचे दोन आमदार गायब

बेंगळुरू येथे सुरू असलेल्या जेडीएसच्या आमदारांच्या बैठकीत ते हजर राहणे अपेक्षित होते. आता त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही.

कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंग सातत्याने किचकट होताना दिसत आहे. भाजपाने काँग्रेसचे काही लिंगायत आमदार आमच्या बाजूने असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे काँग्रेस आमदाराने आपल्याला भाजपाकडून पाठिंब्याच्या बदल्यात मंत्रिपद देण्याची ऑफर दिल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, आता जेडीएसचे दोन आमदार अचानक गायब झाले आहेत. आमदार राजा व्यंकटप्पा नायक आणि वेंकट राव नाडगौडा अशी त्यांची नावे आहेत. सध्या बेंगळुरू येथे सुरू असलेल्या जेडीएसच्या आमदारांच्या बैठकीत ते हजर राहणे अपेक्षित होते. आता त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. दरम्यान, पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत  एचडी कुमारस्वामी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

जेडीएसचे नेते मंजूनाथ यांनी कुमारस्वामी आमचे मुख्यमंत्री असतील आणि काँग्रेसच्या साथीने आम्ही सरकार स्थापन करू असे म्हटले. आम्ही कोणाच्याही प्रभावाखाली नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे सहा आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त काँग्रेसचे नेते एम बी पाटील यांनी फेटाळले असून आम्ही सर्वजण एकत्र असल्याचे सांगितले आहे. उलट भाजपाचेच ६ आमदार आमच्या संपर्ककात असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. पाटील यांच्या या दाव्याने कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 12:11 pm

Web Title: jd s mlas raja venkatappa nayaka and venkata rao nadagouda are karnataka elections 2018
Next Stories
1 गोवा, मणिपूरचा दाखला देत काँग्रेसकडून कर्नाटकमधील कृतीचे समर्थन
2 भाजपा करेल त्या लीला दुसऱ्याने केली तर चोरी: हार्दिक पटेल
3 कर्नाटकात ‘या’ एक्झिट पोलचा अंदाज ठरला खरा
Just Now!
X