02 March 2021

News Flash

कर्नाटकात सर्व काही ठीक नाही, देवेगौडांना आघाडीबाबत चिंता

कर्नाटकमधील आघाडी सरकारमधील एखाद्यानेही आघाडी धर्माचे उल्लंघन केल्यास ते काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अंताचे कारण ठरेल.

कर्नाटकमधील आघाडी सरकारमधील एखाद्यानेही आघाडी धर्माचे उल्लंघन केल्यास ते काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अंताचे कारण ठरेल. याचा जातीयवादी शक्तींना फायदा होईल, असे मत जनता दल सेक्यूलरचे (जेडीएस) प्रमुख एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे.

कर्नाटकमधील आघाडी सरकारमधील एखाद्यानेही आघाडी धर्माचे उल्लंघन केल्यास ते काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अंताचे कारण ठरेल. याचा जातीयवादी शक्तींना फायदा होईल, असे मत जनता दल सेक्यूलरचे (जेडीएस) प्रमुख एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. जर एखाद्या पक्षाने स्वत:ला आपण श्रेष्ठ आहोत, असे मानले तर याचा फायदा विरोधी पक्षालाच होईल. हे आघाडी धर्माचे उल्लंघन ठरेल. हे पाऊल विनाशकारी असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी आघाडीचे सरकार पारदर्शकपणे चालण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस दोघेही एकाच सूत्रावर काम करत आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जेडीएसचे ज्येष्ठ नेते बसवराज होर्ती यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. होर्ती यांनी काँग्रेस आघाडी धर्माचा उल्लंघन करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना शांततेत काम करू दिले जात नसल्याचा आरोप केला होता.

सिद्धरामय्या हे आघाडी सरकार चालवण्यास उत्सुक नाहीत. सिद्धरामय्या यांना आपल्या योजना राबवल्या जाव्यात असे वाटत असेल, आणि हे स्वाभाविक ही आहे. हे सर्वच पक्षात होत असते, असे होर्ती म्हणाले होते. होर्ती हे काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या समन्वय समितीचे प्रमुख आहेत. त्यांनी सिद्धरामय्यांवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 10:38 am

Web Title: jds chief h d deve gowda speaks on congress jds karnataka government
Next Stories
1 2017-18 मध्ये आर्थिक घोटाळेबाजांनी लुटले बँकांचे 41 हजार 167 कोटी रुपये
2 बांगलादेश: शेख हसीना यांच्या पक्षाचा मोठा विजय, चौथ्यांदा पंतप्रधान होणार
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X