News Flash

कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून जेडीएस आमदाराला ३५ कोटींची ऑफर

या दाव्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाने साम-दाम-दंड भेदची निती अवलंबल्याचे चित्र आहे.

भाजपाने आपल्याला सरकारमधून बाहेर पडण्यासाठी ३५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप जेडीएसचे आमदार श्रीनिवास गोवडा यांनी केला आहे.

कर्नाटकातील भाजपाच्या नेत्यांनी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिल्याचा दावा जेडीएसच्या एका आमदाराने केला आहे. या दाव्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी भाजपाने साम-दाम-दंड भेदची निती अवलंबल्याचे चित्र आहे.


जेडीएसचे आमदार के. श्रीनिवास गोवडा यांनी याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, भाजपाचे नेते सी. एन. अश्वथनारायण, एस. आर. विश्वनाथ आणि सी. पी. योगेश्वरा हे माझ्या कार्यालयात आले होते. भेटीदरम्यान त्यांनी मला जेडीएसमधून बाहेर पडून भाजपात येण्यासाठी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली. या सौद्यासाठी आगाऊ ५ कोटींची रक्कमही त्यांनी मला देऊ केली. मात्र, मी पक्षाशी प्रामाणिक असून गद्दारी कधीही करणार नाही असे त्यांना सुनावले.

यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्या कानावर ही बाब घातली असून भाजपाच्या आमदारांना पैसे पुन्हा घेण्यास सांगितल्याचे गोवडा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 4:31 pm

Web Title: jds offers rs 35 crores from bjp mlas to collapse karnataka government
Next Stories
1 अमेरिकेचे ‘चिनुक’ भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात
2 टीएमसी आमदार हत्या : भाजपा नेते मुकुल रॉय यांच्याविरोधात एफआयआर
3 जम्मू-काश्मीर : ५ दहशतवाद्यांना कंठस्नान, चकमकीत ८ नागरिकही जखमी
Just Now!
X