जनता दल युनायटेडच्या मेडिकल सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार सिंह आणि त्यांची पत्नी खुशबू यांना पाटण्यात एका जिम ट्रेनरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डॉक्टर राजीववर पत्नी खुशबूसह २६ वर्षीय जिम ट्रेनर विक्रम सिंगवर ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. जिम ट्रेनरवर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी डॉ.राजीव आणि त्यांची पत्नी खुशबू यांच्याविरोधात कदम कुआन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास विक्रम स्कूटीवर बसून कदम कुआनच्या बुद्धमूर्ती परिसरातील त्याच्या जिम सेंटरकडे जात असताना घडली. या दरम्यान, गुन्हेगार आधीच हल्ला करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी विक्रमवर ५ गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. ५ गोळ्या लागल्यानंतरही, विक्रम कसातरी रुग्णालयात पोहचला ज्याठीकाणी त्याचे ऑपरेशन करण्यात आले.

पदावरून हकालपट्टी

विक्रम सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांनी डॉ राजीव कुमार सिंह आणि त्यांची पत्नी खुशबू सिंह यांची नावे सांगितली आहेत, त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणात डॉ राजीव कुमार सिंह यांचे नाव पुढे आल्यानंतर जनता दल युनायटेडने त्यांची मेडिकल सेलच्या उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच सुरुवातीच्या तपासात अशी माहिती मिळाली आहे की विक्रम आणि खुशबू एकमेकांना आधीच ओळखत होते आणि तासन् तास फोनवर बोलत असत.

विक्रमने आपल्या निवेदनात पोलिसांना सांगितले आहे की खुशबूचे पती डॉ राजीव कुमार सिंह यांना दोघांच्या नातेसंबंधावर संशय होता आणि एप्रिलमध्ये त्याने विक्रमला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि असे मानले जाते की या घटनेत चार ते पाच कॉन्ट्रॅक्ट किलर सहभागी होते.