22 April 2019

News Flash

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, नितीशकुमारांची शक्यताही नाही: प्रशांत किशोर

मी आता एका पक्षाचा सदस्य आहे आणि मी दुसऱ्या कोणाची आता मदत करू शकत नाही, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीविषयी सांगितले.

कोणत्याही परिस्थिती नितीशकुमार पंतप्रधान होणार नाहीत, असे स्पष्ट मत संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही परिस्थिती नितीशकुमार पंतप्रधान होणार नाहीत, असे स्पष्ट मत संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तरीही मोदीच पंतप्रधान होतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार एनडीएचे मोठे नेते आहेत. पण त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पाहणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मुंबई दौऱ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचाही उल्लेख केला. मोदी हे एनडीचे पंतप्रधान आधीपासून आहेत आणि पुढेही तेच राहतील. अशावेळी दुसऱ्या उमेदवाराच्या नावाचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

निवडणुकीनंतर जर कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर अशा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मोदींच्या नावावर सहमती न झाल्यास नितीश कुमार यांच्या नावावर एकमत करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचेही बोलले जात होते.

ते म्हणाले, मी शिवसेनेच्या निमंत्रणावरुन त्यांना भेटायला गेलो होतो. शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे आमच्यात काहीही वेगळे नाही. निवडणुकीच्या दरम्यान रणनीती तयार करण्यासाठी मदत करण्याची शक्यताही नाही. मी आता एका पक्षाचा सदस्य आहे आणि मी दुसऱ्या कोणाची आता मदत करू शकत नाही.

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीवर ते म्हणाले की, ही नियुक्ती एनडीएसाठी आव्हान नाही. कारण कोणाकडेही जादुची छडी नाही, ज्यामुळे लगेच सगळे बदलेन. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. प्रियंका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसाठी प्रतिस्पर्धी ठरणार नाही. पण राजकारणात त्यांच्या येण्याचा भविष्यात प्रभाव दिसेल.

First Published on February 11, 2019 9:30 pm

Web Title: jdu vice president prashant kishor says narendra modi would return as pm after lok sabha polls 2019 discussion on nitish kumar is unfair