संयुक्त जनता दलातील संघर्ष शमण्याची चिन्हे नसून आता शरद यादव यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी जदयूने केली आहे. जदयूच्या नेत्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेत शरद यादव यांची खासदारकी रद्द करण्याबाबत निवेदन दिले. जदयूच्या या निवेदनावर उपराष्ट्रपती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. नितीशकुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र अवघ्या १२ तासांमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपप्रणित एनडीएत सामील होण्याच्या निर्णयाला शरद यादव यांचा विरोध होता. शरद यादव यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. शरद यादव आणि नितीशकुमार यांचे मतभेद आता टोकाला गेले आहेत. जदयूने एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी शरद यादव यांनी मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

Heena Gavit nandurbar
नंदुरबार – धुळ्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादीची नाराजी
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
Umesh Patil On Baramti Lok Sabha Constituency Vijay Shivtare
“विजय शिवतारेंनी खुशाल निवडणूक लढवावी, पण..”, उमेश पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
Kolhapur Lok Sabha
शिंदे गटाचे खासदार माने – मंडलिक यांच्यासाठी संघर्ष कायम

शरद यादव यांनी महाआघाडीला पाठिंबा दर्शवला असून जदयूतील बहुसंख्य नेत्यांचा मला पाठिंबा असल्याचे यादव यांचे म्हणणे आहे. तर नितीशकुमार यांनी शरद यादव यांच्या समर्थकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घडामोडी ताज्या असतानाच आता जदयूने थेट शरद यादव यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. शरद यादव हे राज्यसभेतील खासदार आहेत.