हरयाणातील भिवानी आदर्श महिला महाविद्यालयात चार मुलींना जीन्स व टी-शर्ट घालून गणवेशसंहितेचा भंग केल्याबद्दल प्रत्येकी शंभर रुपये दंड करण्यात आला. प्राचार्या अल्का शर्मा यांनी सांगितले की, काही विशिष्ट पोशाखांवर बंदी घातल्याने छेडछाडीचे प्रकार थांबतील व महाविद्यालयाची शानही राहील असे आम्हाला वाटते. जीन्स व टीशर्ट हे पाश्चिमात्य पोशाख आहेत. हे कपडे आखूड असतात त्यामुळे छेडछाडीचे प्रकार होतात तसेच प्रशासनाला या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. विद्यार्थिनींमध्ये कपडय़ांवरून श्रेष्ठ-कनिष्ठ भेदही होऊ नये हाही यामागचा हेतू आहे.