News Flash

IIT-JEE प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय देशात पहिला

मूळचा चंद्रपूरचा असलेला कार्तिकेय गुप्ता प्रवेश प्रक्रियेच्या अभ्यासासाठी 'मुंबईकर' बनला

Indian Institute of Technology (आयआयटी) प्रवेशसाठीची IIT-JEE Advanced प्रवेश परीक्षेचा परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्राच्या कार्तिकेय गुप्ताने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. je&erdved.aced.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन निकाल पाहाता येणार आहे. २७ मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी (आयआयटी) प्रवेशसाठीची IIT-JEE Advanced प्रवेश परीक्षेचा परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्राच्या कार्तिकेय गुप्ताने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील असलेला कार्तिकेय या प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत अॅलन करिअर इन्स्टिट्यूटच्या निवासी हॉस्टेलमध्ये दोन वर्षं स्थायिक झाला होता.

२७ मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. “राजस्थानातील कोटा येथे आयआयटी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशिक्षण संस्थाचे जाळे आहे. कोटा येथील अॅलन करिअर इन्स्टिट्यूट मुंबईत सुरू झाल्यापासून महामुंबई परिसरातील विद्यार्थ्यांना कोटाला जाण्याची आवश्यकता राहिली नाही”, अशी माहिती अॅलन करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक ब्रजेश माहेश्वरी यांनी दिली.

जेईई मुख्य सामायिक प्रवेश परीक्षेत कार्तिकेय गुप्ता याने १०० पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. IIT-JEE Advanced परीक्षेत १०० एनटीए गुण घेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे.

आपल्या यशाविषयी कार्तिकेय गुप्तां म्हणाला, “या प्रवेश प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी नियमित अभ्यास तर केलाच, पण प्रा. ब्रजेश माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. मला मुळातच गणित-विज्ञान विषयांची आवड असल्यामुळे माझ्यासाठी अभ्यास सोपा झाला.”

“स्मार्टफोनचा उपयोग अभ्यासासाठी निश्चितच होऊ शकतो, मात्र त्याची सवय- addiction लागल्यास अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ शकतो”, असंही कार्तिकेय गुप्ताने आवर्जून सांगितलं. “कार्तिकेयवर आम्ही अभ्यासासाठी कधीही दबाव टाकला नाही, त्याने योग्य मार्गदर्शनाखाली मनापासून अभ्यास केला म्हणून यशस्वी झाला”, असं मत कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता यांनी व्यक्त केलं.

जेईई मुख्य सामायिक प्रवेश परीक्षेत कार्तिकेय चंद्रेश गुप्ता यांनी १०० पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. IIT-JEE Advanced परीक्षेत १०० एनटीए गुण घेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे.

असा पाहा निकाल

– पुढीलपैकी कोणत्याही अधिकृत बेबसाइट्सवर आपला निकाल पाहता येईल-  jeeadv.ac.in  je&erdved.aced.in,  cbseresults.nic.in किंवा results.nic.in
– होमपेजवर गेल्यानंतर जेईई परीक्षेची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्ही थेट निकालाच्या पानावर जाल.
– त्यानंतर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर, नाव आणि जन्म दिनांक नमूद करा आणि सबमिटवर क्लिक करा.
– यानंतर तुमच्या मोबाइल किंवा कंप्युटर स्क्रीनवर निकाल दिसू लागेल.
– निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट देखील घेऊन ठेवा. भविष्यात उपयोगी पडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 11:43 am

Web Title: jee advanced result 2019 jee advanced result 2019 declared at results jeeadv ac in direct link to check here nck 90
Next Stories
1 छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान
2 मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 #WorldBloodDonorDay: देवमाणूस! दर आठवड्याला रक्तदान करुन वाचवले २४ लाख बालकांचे प्राण
Just Now!
X