News Flash

महत्त्वाची बातमी! ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षा वेळेतच होणार; NTA कडून शिक्कामोर्तब

जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर रोजी होणार

संग्रहित (PTI)

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही माहिती देण्यात आली आहे. एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एनटीएने परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असं स्पष्ट केलं आहे.

जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

परीक्षा केंद्रांवर पोहोचायचे कसे? निर्णय
नीट, जेईईची परीक्षा वेळेतच होणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा

नोटीशीत काय म्हटलं आहे –
“नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची होणारी मागणी अधिकारात नसल्याचं आमच्या निदर्शनात आलं आहे. आमच्या मते करोना संकटात आयुष्य थांबता कामा नये. उमेदवारांचं भवितव्य अंधारात टाकू शकत नाही, शिवाय त्यांचं शैक्षणिक वर्षही वाया जाता कामा नये. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन परीक्षा पार पडणार असून ती पुढे ढकलली जाणार नाही. पुनर्विचार याचिका योग्य नाही”.

 

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली असून वेळेतच होईल असा निर्णय दिलेला आहे. न्यायालयाने निर्णय देताना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया घालवू शकत नाही असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 1:15 pm

Web Title: jee main 2020 neet ug 2020 to be conducted as per schedule sgy 87
Next Stories
1 इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला अटक, उत्तर प्रदेश ATS ची टीम दिल्लीत दाखल
2 भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना जवानांनी केलं ठार
3 पंतप्रधानांसाठी तयार केलेलं हजारो कोटींचं ‘विशेष विमान’ पुढील आठवड्यात भारतात
Just Now!
X