News Flash

थोडक्यात बचावला मसूद अझर? पाकच्या लष्करी रुग्णालयात भीषण बॉम्बस्फोट

घटनेचं वार्तांकन करु नये अशी सक्त ताकीद लष्कराकडून माध्यमांना देण्यात आली आहे.

(व्हिडिओचा स्क्रीनशॉट )

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जवळ रावळपिंडी शहरातील लष्करी रुग्णालयात भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटात जवळपास 10 जण गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. ज्या रुग्णालयात बॉम्बस्फोट झाला तेथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर देखील उपचार घेत होता, असं वृत्त एएनआयने ट्विटरच्या आधारे दिलं आहे.


एएनआयने पाकिस्तानच्या क्वेटा येथील सामाजिक कार्यकर्ते एहसान-उल्लाह-मियाखेल यांच्या ट्विटरच्या आधारे हे वृत्त दिलं आहे. एहसान यांनी, ‘रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर 10 जणांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर देखील येथेच उपचार घेत आहे. घटनेचं वार्तांकन करु नये अशी सक्त ताकीद लष्कराकडून माध्यमांना देण्यात आली आहे’, असा दावा ट्विटरद्वारे केला आहे.


हा स्फोट कसा झाला याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही, मात्र हा हल्ला असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावरील काही युजर्सनी या हल्ल्यात मसूद अझर थोडक्यात बचावल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी या हल्ल्यात त्याचा खात्मा झाल्याचाही दावा केला आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पाकिस्तान सरकारकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 10:34 am

Web Title: jem chief masood azhar among 10 injured in pakistan military hospital blast no confirmed reports twitterati claim sas 89
Next Stories
1 खोडियार मातेच्या मंदिरातून अखेर मगरीची सुटका
2 भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये अमेरिकेचा चोंबडेपणा नको-शिवसेना
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X