28 February 2021

News Flash

जेसिका लालच्या मारेकऱ्याला माफी; बहिणीचे कारागृह प्रशासनाला पत्र

तुरुंगात त्याचे वर्तनही सुधारल्याचे मला तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले. त्यामुळे त्याला तुरुंगवासातून मुक्त केल्यास माझा कोणताही आक्षेप नाही

जेसिका लाल (संग्रहित छायाचित्र)

दिल्लीतील मॉडेल जेसिका लाल हत्याप्रकरणात तुरुंगात असलेला सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनू शर्माला जेसिका लालच्या बहिणीने माफ केले आहे. ‘हत्येप्रकरणी मनू शर्मा जवळपास १५ वर्ष तुरुंगात होता. माझ्यासाठी हे पुरेसं आहे. तुरुंगात त्याचे वर्तनही सुधारल्याचे मला तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले. त्यामुळे त्याला तुरुंगवासातून मुक्त केल्यास माझा कोणताही आक्षेप नाही’, असे पत्र जेसिकाच्या बहिणीने तिहार तुरुंग प्रशासनाला पाठवले आहे.

जेसिका लालची बहीण सब्रिना लालला तिहार तुरुंग प्रशासनाकडून एक पत्र पाठवण्यात आले होते. जेसिका लाल हत्याप्रकरणातील दोषी मनू शर्माची तुरुंगातून सुटका करण्यासंदर्भात हे पत्र पाठवण्यात आले होते. मनू शर्मा १५ वर्ष तुरुंगात असून तुरुंगात त्याचे वर्तन सुधारले आहे. अन्य कैद्यांच्या मुलांना शिकवणे, तुरुंगातील कामकाज डिजिटल करणे अशा विविध उपक्रमांमध्ये मनू शर्माने मोलाचे योगदान दिले होते. या आधारे आता त्याच्या शिक्षेचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाने जेसिकाच्या बहिणीला पत्र पाठवले होते.

तुरुंग प्रशासनाच्या पत्राला जेसिकाच्या बहिणीने उत्तर दिले आहे. यात ती म्हणते, जेसिकाच्या मारेकऱ्याला मी माफ केले आहे. माझ्या मनात आता कोणताही राग किंवा द्वेष नाही. माझ्या बहिणीच्या हत्येसाठी तो १५ वर्षांसाठी तुरुंगात होता. माझ्यासाठी हे देखील पुरेसे आहे, असे तिने तुरुंग प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दिल्लीत बारटेंडर म्हणून काम करणाऱ्या जेसिका लालची २९ एप्रिल १९९९ रोजी हत्या करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते विनोद शर्मांचा मुलगा मनू शर्मा हा या प्रकरणातील आरोपी होता. मनू शर्माला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो सध्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 11:02 am

Web Title: jessica lall murder case sister sabrina lall forgive killer manu sharma says no objection to release
Next Stories
1 काँग्रेसला धक्का, उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव
2 चला मैदानांकडे; सीबीएसई शाळांमध्ये एक तासिका खेळांसाठी
3 बांगलादेशाच्या महिला क्रिकेटपटूकडे सापडल्या १४ हजार नशेच्या गोळ्या
Just Now!
X