News Flash

भाजपा नेत्याच्या मुलीची निर्घृण हत्या; डोळे बाहेर काढल्यानंतर झाडाला लटकवला मृतदेह

भाजपा नेत्याच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भाजपा नेत्याच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ (प्रातिनिधिक)

झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एका १६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. झाडाला लटकलेल्या अवस्थेत असणारा मृतदेह सापल्यानंतर एकच खळबल उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करण्याआधी आणि झाडाला लटकवण्याआधी तिचे डोळे बाहेर काढण्यात आले होते. पीडित मुलगी ही स्थानिक भाजपा नेत्याची मुलगी होती. ती दहावीच्या वर्गात होती.

पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलमधील कॉल डेटा रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे २३ वर्षीय प्रदीप कुमार सिंह धुनक याला अटक केली आहे. प्रदीप हा मुख्य संशयित आरोपी असून विवाहित आहे. त्याच्यासोबत इतरही काहीजण सहभागी असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुलगी बेपत्ता होती

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी सकाळी १० वाजता घर सोडल्यानंतर मुलगी बेपत्ता होती. मुलीच्या कुटुंबाने मंगळवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांकडून शोध सुरु असताना गावकऱ्यांना जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह आढळून आला.

हत्या करण्याआधी पीडितेला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर आत्महत्या दर्शवण्यासाठी हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान पीडितेच्या कुटुंबाने आरोपींकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर याबाबत स्पष्ट माहिती मिळेल असं सांगितलं असून आपण सर्व बाजूंनी तपास करत असल्याचं सांगितलं आहे.

पोलीस अधीक्षक संजीव कुमार यांनी पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. “काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी आणि कुटुंबामध्ये जोरदार भांडण झालं होतं. यानंतर ती बेपत्ता झाली होती,” अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान झारखंड भाजपा प्रवक्ते प्रतूल सहदेव यांनी पोलीस योग्य तपास करु शकले नाही तर स्वतंत्र तपासाची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 7:56 am

Web Title: jharkhand bjp leader daughter found hanging from tree with eye gouged out sgy 87
Next Stories
1 “हे म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर चपराक मारण्यासारखं आहे”
2 १४ खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ
3 आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद पुन्हा सुरू करण्याची केंद्रीय कृषिमंत्र्यांची तयारी
Just Now!
X