21 October 2020

News Flash

ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात, ११ प्रवाशांचा मृत्यू

दानुआ घाटीत एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे.

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी पहाटे एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग दोन वर हा अपघात घडला. बसचे ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळत आहे.

झारखंडच्या राची मधून निघालेली ही बस बिहारमधील गया येथे चालली होती. पहाटे तीनच्या सुमारास या बसने लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रेलरला धडक दिली. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती कि, बसच्या चालकासह ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

पहाटेच्या समयी प्रवासी गाढ झोपेत असताना मृत्यूने त्यांना गाठले. हजारीबागचे उपायुक्त रविशंकर शुक्ला यांच्या देखरेखीखाली घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. सर्व जखमींना चौपारण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 11:30 am

Web Title: jharkhand bus accident national highway 2 in danuwa ghati dmp 82
Next Stories
1 अलीगढमधील हत्याप्रकरणावर शिवसेना म्हणते, ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात
2 ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन
3 Kathua gang rape and murder case: आज आरोपींचा फैसला
Just Now!
X