19 September 2020

News Flash

वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मंत्री महोदय पंतप्रधान मोदींचेच नाव विसरले

यापूर्वीही त्यांनी वाद ओढावून घेतला होता.

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव माहित नसलेली क्वचितच कोणी व्यक्ती सापडेल. झारखंडमधील भाजपाचे आरोग्य मंत्री रामचंद्र चंद्रवंशी अशाच एका अजब स्थितीत फसल्याचे पहायला मिळाले. माध्यमांशी संवाद साधताना ते चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव विसरले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते शुभेच्छा देत होते, परंतु त्याचवेळी ते त्यांचं नावच विसरले.

अनेक प्रयत्न करूनही रामचंद्र चंद्रवंशी पंतप्रधानांचे नावच आठवले नाही. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चंद्रवंशी हे आपल्या रांची येथील निवासस्थानाहून निघाले असता माध्यमांनी त्यांच्याकडून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिक्रिया मागितली. यानंतर चंद्रवंशी यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा तर दिल्या परंतु त्यांना त्यांचे नावच आठवले नाही.

यापूर्वी गढवाम येथे एका उद्घाटन कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी असेलेल्या कोनशिलेवर आपले नाव नसल्याचे पाहून नाराज होत ते उद्घाटन न करताच परतले होते. रामचंद्र चंद्रवंशी हे आरजेडीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. झारखंडमधील बिश्रामपूर येथून ते निवडून आले आहेत. ते यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. 2015 मध्ये त्यांनी एका सभेदरम्यान आरजेडीचे जिल्हा अध्यक्ष शंभूनाथ चंद्रवंशी यांना कानशिलात लगावली होती. त्यानंतर त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 10:51 am

Web Title: jharkhand health minister ramchandra chandravanshi forgot pm narendra modi name while giving birthday greetings jud 87
Next Stories
1 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्वदेशी ‘तेजस’मधून भरारी
2 ‘वाईफ स्वापिंग’ला नकार देणाऱ्या पत्नीवर मित्रांच्या मदतीने केला सामूहिक बलात्कार
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X