News Flash

शाळेत विद्यार्थ्यांना दारू वाटप!

'पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी'(पीयूसीएल) या पाच जणांच्या पथकाने जिल्ह्यातील कुदरूम जनजातीय आवासीय विद्यालयात छापा मारला असता हा प्रकार उघडकीस आला आहे.

| September 15, 2014 04:19 am

दारुची तस्करी केल्याप्रकरणी चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला अटक.

झारखंडमधील गरवा जिल्ह्यातील शाळेत विद्यार्थ्यांना दारू वाटण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी'(पीयूसीएल) या पाच जणांच्या पथकाने जिल्ह्यातील कुदरूम जनजातीय आवासीय विद्यालयात छापा मारला असता हा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे, तर या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अश्लील चित्रफितीही दाखविल्या जात असल्याचा आरोप ‘पीयूसीएल’चे सदस्य सुरेश मानस यांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, शाळेचे मुख्याध्यापक गणेशसिंह मुंडा यांनी या प्रकाराची पाठराखण करत ‘शिक्षक काय किंवा विद्यार्थी काय, सर्वच गावकरी दारू पितात’ असे अजब तर्कट मांडले आहे. तसेच येथील दोन शिक्षकांना वगळता इतर सर्वच दारु पितात असेही मुंडा म्हणाले. दरम्यान, ‘पीयूसीएल’ या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारकडे त्वरित पाठविणार असून झारखंडचे ग्रामविकास मंत्री के. एन. त्रिपाठी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश सुद्धा दिले आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 4:19 am

Web Title: jharkhand school serves liquor to students
Next Stories
1 मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण
2 मुसळधार पावसामुळे काश्मीरमध्ये मदतकार्यात अडथळे
3 मी माझे कर्तव्य बजावले-मनमोहन सिंग
Just Now!
X