News Flash

झारखंडच्या पलामू व्याघ्र प्रकल्पात बिबट्यांचा वावर!; वाघांच्या घरवापसीसाठी प्रयत्न सुरू

स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ साली या भागात वाघांची संख्या सर्वाधिक होती. मात्र आता या भागात एकही वाघ पाहायला मिळत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पावर आता बिबट्यांनी ताबा मिळवला आहे. या व्याघ्रप्रकल्पात जवळपास १५० हून अधिक बिबट्यांचा वावर पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ साली या भागात वाघांची संख्या सर्वाधिक होती. मात्र आता या भागात एकही वाघ पाहायला मिळत नाही. या भागात फेब्रुवारी २०२० मध्ये बेटला राष्ट्रीय उद्यानाजवळ शेवटीची वाघिण मृतावस्थेत आढळून आली होती. एकेकाळी वाघांसाठी प्रसिद्ध असलेला भागात वाघ नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता बिबट्यांनी या परिसरात आपलं बस्तान मांडलं आहे.
१९७३-७४ साली येथे व्याघ्रप्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. पलामू हा भाग संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. १९९५ साली येथे वाघांची संख्या ही ७१ होती. मात्र त्यानंतर वाघांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. २०१४ साली येथे केवळ तीन वाघ शिल्लक राहीले होते. तर २०१९मध्ये इथे एकाही वाघाचं दर्शन झालं नाही. देशातील ९ व्याघ्रप्रकल्पांपैकी पलामू व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र आता वाघ नसल्याने बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

“वाघांची संख्या कमी होण्यामागे मानवी वस्त्यांचं अतिक्रमण असल्याचं मुख्य कारण आहे. त्याचबरोबर जंगलात फोफावलेला नक्षलवाद आणि त्यांना रोखण्यासाठी सुरक्षादलाच्या वाढलेल्या गस्ती यामुळेही वाघांची संख्या घटल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ११३० चौरस किमी पसरलेल्या या व्याघ्र प्रकल्पातून वाघांनी पलायन केलं. वाघांनी छत्तीसगड, ओडिशा या राज्यांतील जंगलात बस्तान बसवलं. मात्र आता वाघांना या प्रकल्पात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाघांना शिकारीसाठी आवश्यक जीवनसाखळीवर भर दिला जात आहे. या व्याघ्रप्रकल्पात बिबट्यांसह हत्ती, कोल्हे, अस्वल यांचाही समावेश आहे.” असं व्याघ्रप्रकल्प अधिकारी दास यांनी सांगितलं. “मागे केलेल्या गणनेत एकाही वाघांची नोंद झाली नाही. त्यामुळे त्यांना इथे सुरक्षित वाटावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अतिक्रमण झालेली गावं दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात येत आहेत”, असं देखील त्यांनी सांगितलं.

Corona: चीनमध्ये ३ वर्षांवरील मुलांचं होणार लसीकरण!; ‘करोनाव्हॅक’ लसीला दिली मंजुरी

व्याघ्र प्रकल्पातील गावं हटवणार!

व्याघ्र प्रकल्पात असलेली गावं हटवण्यासाठी काम सुरु आहे. यासाठी एक योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार प्रकल्पबाधित लोकांना १५ किंवा १० लाख रुपये आणि ५ एकर जमिन देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी २६ कोटींची योजना आखण्यात आली आहे. प्रकल्पातील कुजरुम, लाटू, रामनडग, हैनार, गुटुचा, विजयपूर, गोपखड आणि पांड्रा गावांचं स्थलांतर करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 8:49 pm

Web Title: jharkhands palamu tiger reserve home for 150 leopards no tiger has been seen since february 2020 rmt 84
टॅग : Tiger
Next Stories
1 Corona: चीनमध्ये ३ वर्षांवरील मुलांचं होणार लसीकरण!; ‘करोनाव्हॅक’ लसीला दिली मंजुरी
2 डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला करोनाची लागण; मेदांता रुग्णालयात केलं दाखल
3 दिलासादायक!, दिल्लीत करोना रुग्ण संख्येत कमालीची घट; उद्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु
Just Now!
X