News Flash

विधानसभा पोटनिवडणूक: रामगडमध्ये काँग्रेसचा तर जिंदमध्ये भाजपाचा विजय

हरयाणातील जिंद विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांचा पराभव झाला.

रामगड आणि जिंद येथील निवडणूक काँग्रेस आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाची होती.

हरयाणातील जिंद आणि राजस्थानमधील रामगड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अनुक्रमे भाजपा आणि काँग्रेसने विजय मिळवला आहे. रामगडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार साफिया जुबेर खान यांनी भाजपाचे उमेदवार सुवंत सिंग यांचा १२२२८ मतांनी पराभव केला. जुबेर यांना ८३३११ तर सुवंत सिंग यांना ७१०८३ मते मिळाली.  तर जिंद मतदारसंघात भाजपाने विजय मिळवला. जिंद मतदारसंघात जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) दिग्विजय चौटाला आणि भाजपाचे कृष्णा मिढ्ढा यांच्यात अटीतटीची लढत झाली. मिढ्ढा यांनी चौटालांचा १२९३५ मतांनी पराभव केला.मिढ्ढा यांना ५०५६६ तर चौटाला यांना ३७६३१ आणि काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना २२७४० मते मिळाली.

प्रारंभी दिग्विजय चौटाला हे आघाडीवर होते. त्यानंतर मिढ्ढांनी आघाडी घेतली. ती त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. विशेष म्हणजे काँग्रेसकडून उभा असलेले सुरजेवाला यांना प्रभाव पाडता आला नाही.  दरम्यान, इव्हीएममध्ये फेरफार केल्याचा काँग्रेससह जेजेपीने आरोप केला. यावेळी प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यामुळे काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला.

 

 

दोन्ही पोटनिवडणुकीत हरयाणातील जिंद मतदारसंघाची मोठी चर्च आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत ७५ टक्के मतदान झाले होते. जिंदमध्ये भाजपा, काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) आणि नवा पक्ष जेजेपी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये आयएनएलडीतून दोनवेळा आमदार झालेले हरिचंद मिड्ढा यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपाने हरिचंद मिड्ढा यांचा मुलगा कृष्णा मिड्ढाला निवडणुकीसाठी उभा केले आहेत. तर काँग्रेसने प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना उमेदवारी दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 9:56 am

Web Title: jind ramgarh bypoll results 2019 updates bjp congress
Next Stories
1 राम मंदिर वाद: अयोध्येतील ६७ एकर जागेसंदर्भात काय होती वाजपेयींची भूमिका?
2 एकदा खुर्चीवरून उठल्यानंतर वकिलांशी बोलत नाही, सरन्यायाधीशांनी सुनावले
3 निर्णयांना राजकीय रंग देणे न्यायालयाचा अवमान, सुप्रीम कोर्टाने वकिलांना फटकारले
Just Now!
X