News Flash

जिंदाल ग्रुपने चुकीची माहिती सादर केली

नवीन जिंदाल ग्रुपने अनेक बाबी लपविल्या आणि सन २००७ मध्ये झारखंड सरकारकडून कोळसा खाणी लाटल्या, असा ठपका केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपल्या प्राथमिक तपास

| July 2, 2013 01:38 am

नवीन जिंदाल ग्रुपने अनेक बाबी लपविल्या आणि सन २००७ मध्ये झारखंड सरकारकडून कोळसा खाणी लाटल्या, असा ठपका केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपल्या प्राथमिक तपास अहवालात ठेवला आहे. हा अहवाल सीबीआयने सोमवारी न्यायालयात दाखल केला. जिंदाल ग्रुपने चुकीची माहिती सरकारपुढे सादर केल्यामुळे झारखंड सरकारने कोळसा वाटपात अन्य कंपन्यांना डावलले, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.अमरकोंडा मुर्गदंगल येथील कोळसा खाणी जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि गगन स्पंज आयर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना देण्यास कोळसा मंत्रालयास विरोध केला होता, असे नमूद करीत सीबीआयने काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्यावर आरोप ठेवले आहेत. या आरोपपत्रात माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. जिंदाल यांच्यावर ‘कृपादृष्टी’ ठेवण्याची विनंती लेखी पत्राद्वारे कोळसा सचिवांना केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 1:38 am

Web Title: jindal group submitted incorrect information
Next Stories
1 मी रॅम्बो नाही: नितीशकुमारांचा मोदींना टोला
2 भेसळयुक्त दूधविक्रीबद्दल सर्वोच्च न्यायालयाला चिंता
3 इशरत जहॉं चकमक: ‘सीबीआय तपास अधिकाऱयांना अधिक सुरक्षा द्या’
Just Now!
X