News Flash

जियोला ‘रग्गड’ फायदा तर आयडियाला तिप्पट नुकसान

आयडियाने आर्थिक पडझडीला गळेकापू स्पर्धा आणि कठोर नियमांना जबाबदार धरले आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४,१३९.९० कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले.

प्राइस वॉरमुळे जिओ वगळता इतर दूरसंचार कंपन्यांची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. आर्थिक वर्ष २०१८ च्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्यूलरचे नुकसान तिपटीने वाढून ९३०.६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. ऑपरेटिंग रेव्हेन्यू २४ टक्क्यांनी कमी होऊन ६,१३७.३ कोटी रूपये इतका झाला आहे.

आयडिया सेल्यूलरने आर्थिक पडझडीला गळेकापू स्पर्धा आणि कठोर नियमांना जबाबदार धरले आहे. आयडियाला आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४,१३९.९० कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कंपनीच्या नुकसानीचा आकडा ४०४ कोटी रूपयांपर्यंत आला होता.

दरम्यान, याच कालावधीत रिलायन्स जिओने ५१० कोटी रूपयांचा फायदा कमावला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जिओच्या प्रवेशानंतर दूरसंचार क्षेत्रात प्राइस वॉर भडकले आणि याचा थेट आणि नकारात्मक परिणाम प्रतिस्पर्धी कंपनींच्या ताळेबंदावर पडत असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2018 5:40 pm

Web Title: jio get profit but idea cellular have huge loss
Next Stories
1 पाकिस्तानकडे दुर्लक्ष करुन जिनपिंग आणि मोदींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
2 पुन्हा डोकलाम टाळण्यासाठी नरेंद्र मोदी-जिनपिंग भेटीमध्ये ठरला हा ‘फॉर्म्युला’
3 UPSC EXAM: चार वर्षांच्या मुलाची आई असलेली अनु कुमारी देशात दुसरी
Just Now!
X