News Flash

भारतीय समाजाचे तालिबानीकरण होतेय; शबनम हाश्मी यांची ‘पुरस्कार वापसी’

हे सर्व लोक भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील आहेत.

| June 27, 2017 09:03 pm

Shabnam Hashmi : शबनम हाश्मी या अनहद या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन २००८ मध्ये काँग्रेस सरकारने त्यांना पुरस्कार प्रदान केला होता.

देशभरात जमावाकडून लोकांना ठार मारण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये विशेष करून मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील व्यक्तींना लक्ष्य करण्यात येत असून त्यावर केंद्र सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. या घटना थांबवण्यासाठी सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. भारतीय समाजाचे होत असलेले हे तालिबानीकरण चिंताजनक असल्याचे सांगत ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या शबनम हाश्मी यांनी मंगळवारी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने दिलेला पुरस्कार परत केला आहे.

शबनम हाश्मी या अनहद या स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन २००८ मध्ये काँग्रेस सरकारने त्यांना पुरस्कार प्रदान केला होता. मात्र, त्यांनी मंगळवारी अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार परत केला. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जमावाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना ठेचून मारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध केला. भारतीय समाजाचे होत असलेले हे तालिबानीकरण चिंताजनक आहे. त्यामुळे माझा सरकारवर खूप राग आहे. यापैकी काही घटना सरकार स्वत: घडवून आणत आहे आणि काही घटना इतरांकडून घडवून आणल्या जात आहेत. हे सर्व लोक भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील असल्याचा थेट आरोप शबनम हाश्मी यांनी केला.

भाजप कार्यकर्त्यांचे अजब कृत्य, गोमांस खाल्ल्याच्या आरोपावरून गोमूत्र शिंपडून इमारतीचे शुद्धीकरण

देशात धार्मिक उन्माद वाढला आहे. तसे वातावरणच तयार केले जात आहे. आधी अखलाक, नंतर पहलू खान आणि आता जुनैदला जमावाने क्रुरपणे ठेचून मारले. केवळ मुस्लिमांवरच नव्हे तर दलितांवरही अत्याचार होत आहेत. केवळ बीफ खाल्ल्याच्या अफवेनेही अमानुष मारहाण केली जात असल्याने व्यथित होऊन मी पुरस्कार परत केलाय, असे हाश्मी यांनी सांगितले.गेल्या काही वर्षापासून हिंदू राष्ट्र बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मुस्लिम द्वेष पसरविला जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून जुनैद सारख्या तरूणांना जमावाकडून ठेचून मारले जात आहे आणि सरकार तमाशा पाहत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. हे सगळे घडत असताना राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग या मुद्यांवर मुग गिळून बसला आहे. त्यावर ते बोलत नाहीत आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे रक्षणही करत नाहीत. या सगळ्याचा विरोध म्हणून हा पुरस्कार . या पुरस्कारासोबत रोख रक्कम देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे केवळ पुरस्कार परत करत असल्याचे शबनम हाश्मी यांनी म्हटले.

गोंयतील क्रांतिचक्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 9:03 pm

Web Title: jk cop lynching activist shabnam hashmi returns award says talibanisation happening in society
Next Stories
1 ‘यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्लाची शक्यता’
2 आम्ही काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणारच; पाकिस्तानची दर्पोक्ती
3 बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या माजी मंत्र्याची मुलायमसिंहाकडून पाठराखण
Just Now!
X