जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये बुधवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेली चकमक संपुष्टात आली आहे. या कारवाईत भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. आज सकाळी कालारुस परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराकडून कारवाईला सुरुवात झाली. भारतीय जवान आणि दहशतवादी समोरासमोर आल्यानंतर जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी पोलीस दलाचा एक जवानही जखमी झाला. मात्र,

होळीच्या दिवशीही पाकिस्तानी सैन्याने पुँछ सेक्टरमध्ये दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानी सैन्याने तोफगोळ्यांचा मारा केला, तसेच स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला होता. जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्य़ात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने भारतीय लष्कराने त्याला प्रत्युत्तर दिले होते.

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या उभय देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन तसेच घुसखोरीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काल लोकसभेत सांगितले. शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना आणि गोळीबार रोखण्यासाठी लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिल्याचेही अहिर यांनी सांगितले. गेल्यावर्षी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून २२८ वेळा, तर आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर २२१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. या घटनांमध्ये १३ नागरीक ठार, ८३ जखमी झाले आहेत. तर लष्कराचे आठ जवान शहीद झाले आहेत. तर ७४ जवान जखमी झाले आहेत. याशिवाय या घटनांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद, तर २५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिली. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून २२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे, तर आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या सहा घटना घडल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तसेच राजनैतिकदृष्ट्या पाकिस्तानवर दबाब निर्माण केला जात आहे.