05 March 2021

News Flash

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; दोन जखमी

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात पोलिसांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी हुतात्मा झाला असून दोन पोलीस जखमी झाले आहेत.

| December 2, 2013 04:03 am

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात पोलिसांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी हुतात्मा झाला असून दोन पोलीस जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चादुरा पोलीस स्टेशनबाहेर पोलीस अधिकारी शबिर अहमद व इतर दोन पोलीस आपल्या वाहनामध्ये बसत असताना अचानक काही दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारात शबिर अहमद शहीद झाले. तर अन्य दोन पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद शफी व फरदौस अहमद अशी या जखमी झालेल्या पोलीसांची नावे आहेत.
सध्या संबंधित परिसराला पोलिसांनी घेरले असून पोलीस दहशतवाद्यांच्या मागावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2013 4:03 am

Web Title: jk sho killed two cops injured as militants attack police party
Next Stories
1 उत्तरप्रदेशात मोदींच्या ‘रन फॉर युनिटी’साठी गुजरातहून १२ अधिकारी रवाना
2 दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्राला नोटीस
3 जनतेची दिशाभूल होण्यासाठी काँग्रेसची माझ्यावर टीका – मोदी
Just Now!
X