20 January 2021

News Flash

रुबिया सईद अपहरणप्रकरणी आरोप निश्चित

विशेष टाडा न्यायालयाने मलिक आणि अन्य सहा जणांविरुद्ध आरोप निश्चित केले होते

| January 13, 2021 03:31 am

(जेकेएलएफ) नेते यासिन मलिक

जम्मू : माजी केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सदई यांचे ३१ वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आले होते त्याप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने जम्मू-काश्मीर मुक्ती संघटनेचे (जेकेएलएफ) नेते यासिन मलिक आणि अन्य नऊ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत.

दहशतवादाला पैसे पुरविल्याच्या प्रकरणाच्या आरोपावरून मलिक याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१९ मध्ये अटक केली असून सध्या तो तिहार कारागृहात आहे. त्यानंतर एका महिन्याने केंद्र सरकारने त्याच्या गटावर बंदी घातली होती.

श्रीनगरमध्ये १९९० मध्ये भारतीय हवाई दलाच्या चार अधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

त्याप्रकरणी गेल्या मार्च महिन्यात विशेष टाडा न्यायालयाने मलिक आणि अन्य सहा जणांविरुद्ध आरोप निश्चित केले होते.

जेकेएलएफने ८ डिसेंबर १९८९ रोजी रुबिया सईद यांचे श्रीनगरमधून अपहरण केले होते आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात विविध कारागृहांमध्ये असलेल्या आपल्या साथीदारांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 3:31 am

Web Title: jklf chief yasin malik framed by tada court for kidnapping rubaiya sayeed in 1989 zws 70
Next Stories
1 ट्रम यांच्यावर कंपन्यांचाही बहिष्कार
2 आयसिसमध्ये दाखल डॉक्टरविरुद्ध आरोपपत्र
3 कृषी कायद्यांना स्थगिती: “समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल आल्यावर तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवतो…”
Just Now!
X