13 August 2020

News Flash

जेकेएलएफचा नेता अमानुल्लाह खान याचे पाकिस्तानात निधन

गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानात वास्तव्य करणारा अमानुल्लाह खान फुप्फुसाच्या विकाराने आजारी होता.

जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचा (जेकेएलएफ) एक संस्थापक अमानुल्लाह खान (८०) याचे मंगळवारी पाकिस्तानात निधन झाले. स्वतंत्र काश्मीरच्या मागणीसाठी अमानुल्लाह खान याने १९८० च्या दशकांत ब्रिटनमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हत्या केली होती आणि इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे लाहोरला अपहरण केले होते.

गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानात वास्तव्य करणारा अमानुल्लाह खान फुप्फुसाच्या विकाराने आजारी होता. रावळिपडीतील गॅरिसन शहरांतील रुग्णालयात त्याचे निधन झाले. तीन आठवडय़ांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पाकिस्तानला पाठवणी करण्यात येण्यापूर्वी अमानुल्लाह खान ब्रिटनमध्ये होता. भारतीय वकिलातीमधील अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची बर्मिगहॅममध्ये १९८४ मध्ये हत्या करण्यात आली त्याचा अमानुल्लाह सूत्रधार होता. जेकेएलएफचा संस्थापक मकबूल बट याची कारावासातून सुटका करण्याच्या मागणीसाठी म्हात्रे यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2016 2:38 am

Web Title: jklf leader amanullah khan dead in pakistan
टॅग Pakistan
Next Stories
1 परराष्ट्र सचिव भेटीत कटु मुद्दय़ांचीच उजळणी
2 दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी कारावासाच्या शिक्षेची शिफारस
3 संपत्तीची संपूर्ण माहिती बँकांना द्या, सुप्रीम कोर्टाचे विजय मल्ल्यांना आदेश
Just Now!
X