News Flash

राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते उपराष्ट्राध्यक्षांना बहुमान

अमेरिकेचे मावळते उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ओबामांच्या हस्ते अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.

बराक ओबामांनी दिलं मावळत्या उपराष्ट्राध्यक्षांना 'फ्री़डम मेडल'. मेडल स्वीकारताना जो बायडेन यांचे अश्रू अनावर

अमेरिेकेचे मावळते उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा ‘फ्रीडम मेडल’ देऊन सत्कार करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते बायडेन यांना अमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार स्वीकारताना बायडेन यांना अश्रू अनावर झाले.

गेली आठ वर्ष बराक ओबामा यांच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या जो बायडेन यांना ओबामांसारखी प्रसिध्दी कधीच मिळाली नाही. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरच प्रसिध्दीचा सगळा झोत होता. त्यांच्यासोबत काहीसे पडद्याआड राहत उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेचा कारभार सांभाळला. गेल्या आठ वर्षांमध्ये त्यांना प्रसिध्दी मिळाली ती रिपब्लिकन पक्षाच्या डाॅनल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर.

अमेरिकन जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून दिलं आणि नंतर बऱ्याच प्रांतातल्या नागरिकांनी ट्रम्पला मतदान केल्याबद्दल खेद व्यक्त केला आणि त्यानंतर इंटरनेटवर ‘ओबामा-बायडेन मीम्स’ची क्रेझ सुरू झाली. डोनाल्ड ट्रम्पला व्हाईट हाऊसमध्ये येण्यापासून रोखता कसं येईल याबद्दल जो बायडेन आणि बराक ओबामा चर्चा करत आहेत या विषयावर शेकडो नेटयूझर्सनी ही मीम्स तयार केली. एरव्ही ओबामांच्या तुलनेत काहीसं दुय्यम स्थान मिळालेले जो बायडेन या  मीम्समध्ये मात्र हीरो होते. डोनाल्ड ट्रम्पला व्हाईट हाऊसमध्ये येण्यापासून रोखता कसं येईल याची शक्कल लढवणारे जो बायडेन यांचे हे धमाल मीम्स जबरदस्त व्हायरल झालेत.

 

1. ठरवलं म्हणजे ठरवलं!

 

ठरवलं म्हणजे ठरवलं! सौजन्य: ट्विटर

 

2.  हे पण चालेल ना?

 

हे पण चालेल!

सौजन्य: ट्विटर

 

 

 

 

 

 

 

 

३.  मेरे नये पिलान के मुताबिक…

 

मेरे नये पिलान के मुताबिक...

सौजन्य: ट्विटर

 

गेली आठ वर्षं ओबामांना साथ देणाऱ्या बायडेन यांना व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या समारंभात फ्रीडम मेडल प्रदान करण्यात आलं. त्यांना हे मेडल ‘डिस्टिंक्शन’च्या सन्मानासहित दिलं गेलं. फ्रीडम मेडल प्रदान करताना देण्यात आलेला हा वेगळा सन्मान फक्त काही मोजक्या व्यक्तींनाच मिळाला आहे. पोप जाॅन पाॅल दुसरे यांना हा बहुमान अमेरिकन सरकारने दिला होता.

अमेरिकेच्या राजकीय, सामाजिक जीवनात, अमेरिकेच्या संस्कृतीत अतिशय मोलाची भर घालणाऱ्या तसंच जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या मोजक्याच लोकांना अमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो. आजचा पुरस्कार स्वीकारताना बायडेन यांना अश्रू अनावर झाले. मला हा पुरस्कार मिळणार असल्याबाबत काहीच माहिती नव्हती असं ते म्हणाले. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेच्याच हेरखात्यावर काही दिवसांपूर्वी आगपाखड केली होती. अमेरिकेच्याच भावी अध्यक्षाने अमेरिकन हेरयंत्रणेवर टीका केल्याने बायडेन यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांच्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या माईक पेन्स यांना मात्र त्यांनी  शुभेच्छा दिल्या. पेन्स उपराष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हातात घेताना त्यांना कामकाजात त्रास होणार नाही याची व्यवस्था आपण करणार असल्याचं ते म्हणाले.

आपण यापुढेही राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं बायडेन यांनी जाहीर केलं. तसंच कॅन्सरविषयक संशोधनाला चालना मिळावी यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत. बायडेन यांच्या मुलाचं २०१५ साली कॅन्सरमुळे निधन झालं होतं.

बराक ओबामांनी आपल्या भाषणात बायडेनविषयी गौरवाचे उद्गार काढले. जो बायडेन हे फक्त माझीच ‘बेस्ट चाॅईस ‘ नव्हते तर अमेरिकन जनतेची पूर्ण पसंती त्यांना मिळाली असं ओबामा म्हणाले

अमेरिकेचा पहिला ‘सोशल मीडिया प्रेसिडेंट’ असणारे बराक ओबामा इंटरनेट मीम्स बद्दल बोलले नसते तरच नवल होतं

”आमच्या दोघांचा ‘ब्रो’मान्स (रोमान्स नाही) जगाला दाखवण्याची आजची कदाचित शेवटची संधी आहे” ओबामा म्हणाले.

संपूर्ण जगच या दोघा ‘माणसां’ना खरोखर मिस करेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 7:38 pm

Web Title: joe biden honoured given freedom medal by barack obama
Next Stories
1 तीळगूळ घ्या, गोड-गोड बोला!; नितीशकुमारांचे भाजपला संक्रांतीचे निमंत्रण
2 गोळीबार थांबला नाही तर, पुन्हा सर्जिकल स्ट्राईक; लष्करप्रमुखांचा पाकला इशारा
3 मोहन भागवत यांच्या सभेला कोलकाता हायकोर्टाची परवानगी
Just Now!
X