News Flash

भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्याचे संकेत

भारत व अमेरिका यांच्यात चांगले संबंध राहावेत असे मत बायडेन यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.

वॉशिंग्टन : भारत व अमेरिका यांच्यातील भागीदारी ही २१ व्या शतकास आकार देणारी ठरेल, तसेच दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत केले जातील, असे संकेत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहेत.

भारत व अमेरिका यांच्यात चांगले संबंध राहावेत असे मत बायडेन यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. यापूर्वी बायडेन हे जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी  दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट  स्पष्ट केले होते.  सध्या दोन्ही देशातील व्यापार दीडशे अब्ज डॉलर्सचा आहे. बायडेन यांनी भारत—अमेरिका संबंधाबाबत अनेकदा मते व्यक्त केली आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रचाराच्या वेळी भारतातील हवा वाईट असल्याचे जे वक्तव्य केले होते त्याला बायडेन यांनी आक्षेप घेतला होता. एखाद्या मित्र देशाबाबत कुणी असे बोलेल का, असे सांगून बायडेन यांनी म्हटले होते, की हवामान बदलाचे प्रश्न आपणच सोडवायचे आहेत.

बायडेन यांनी असेही म्हटले आहे, की कमला हॅरिस व मी दोघांनाही भारताशी भागीदारी महत्त्वाची  वाटते. दोन्ही देशातील मैत्रीच्या संबंधांना मध्यवर्ती स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

पंधरा वर्षांंपूर्वी मी सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे नेतृत्व करीत असताना रिपब्लिकन नेते डिक ल्युगारही समवेत होते. त्या वेळी आम्ही भारताशी ऐतिहासिक अणुकरार केला होता.  भारत व अमेरिका जवळ आले तर जग सुरक्षित होईल. बराक ओबामा यांच्या काळात भारत व अमेरिका यांच्यातील संबंध सर्वात चांगले  होते, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 3:16 am

Web Title: joe biden indications to strengthen indo us partnership zws 70
Next Stories
1 भारत-चीन सीमावाद  पुन्हा उफाळणार?
2 बायडेन यांचे स्थलांतरितांबाबत सहानुभूतीचे धोरण
3 एच १ बी व्हिसासाठीच्या मर्यादेत वाढीची अपेक्षा
Just Now!
X