News Flash

अमेरिकेत मोठी जीवितहानी; अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली माहिती

"अमेरिका या सर्वात कठीण काळावर मात करेल"

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे सर्व जगात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की, या देशाने सामूहिक बलिदान दिले आहे. या रोगामुळे निर्माण झालेल्या “सर्वात कठीण आणि गडद काळावर” अमेरिका मात करेल, असेही त्यांनी नमूद केले.

२९ दशलक्षाहून अधिक अमेरिकी लोकांना या विषाणूची लागण झाली आहे आणि ५ लाखापेक्षा जास्त लोकांनी यामुळे आपला जीव गमावला आहे. एका वर्षापूर्वी अमेरिकेत करोना विषाणूचा पहिला रूग्ण आढळला होता. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जो बायडेन देशाला संबोधित करत होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी राष्ट्रीय भावनेचे कौतुक केले आणि म्हणाले की, “अंधारात प्रकाश मिळविणे ही एक अमेरिकन गोष्ट आहे, खरं तर ही अमेरिकन गोष्ट आपण बऱ्याच वेळा केलेली आहे आणि यावेळी देखील आपण तेच केले आहे.”

“मला माहित आहे की हे कठीण आहे, मला खरोखरच माहित आहे … आजतागायत कोविड -१९ मुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या मला माहिती आहे … आतापर्यंत अमेरिकेत एकूण – ५,२७,७२६ लोकांचा मृत्यु झाला आहे – ही संख्या “पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, व्हिएतनाम युद्ध आणि ९/११ हा दहशतवादी हल्ला या सगळ्यात मृत्यू पावलेल्या लोकांच्या एकत्रितपणे संख्येपेक्षा अधिक आहेत”, असे बायडेन म्हणाले.

राष्ट्रपतींनी असेही म्हटले आहे की ४ जुलैच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीपर्यंत देशात सगळीकडे सामान्य वातावरण निर्माण व्हावे यासाठी सरकारने देशातील सर्व लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र बनवावे अशी त्यांची इच्छा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 11:40 am

Web Title: joe biden says covid 19 claimed more us lives than world wars vietnam war combined sbi 84
Next Stories
1 मोठी बातमी! इंजिनिअर होण्यासाठी आता 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची गरज नाही; AICTE चा निर्णय
2 पश्चिम बंगालमध्ये करोना लस घेणाऱ्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; तपास सुरु
3 …अन् पाहता पाहता १२ लाख रुपये जळून झाले खाक
Just Now!
X