News Flash

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन कुत्र्यासोबत खेळताना पाय घसरुन पडले आणि….

मेजरसोबत खेळत असताना ७८ वर्षीय बायडेन...

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या उजव्या पायाला हेअरलाइन फ्रॅक्चर झालं आहे. पुढचे काही आठवडे त्यांना विशेष बूट वापरावा लागू शकतो, असे त्यांच्या डॉक्टरने सांगितले. बायडेन आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना, पाय घसरुन पडले, त्यांच्या उजव्या पायाच्या घोटयाला दुखापत झाली. एक्सरे मध्ये कुठेही फ्रॅक्चर दिसले नव्हते. पण अजून काही तपासण्या केल्यानंतर फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले, असे डॉ. केविन ओ कॉननॉर यांनी रविवारी सांगितले.

सीटी स्कॅनमध्ये छोटेसे हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचे दिसले. त्यांना काही आठवडे वॉकिंग बूट वापरावा लागू शकतो असे ओ कॉननॉर यांनी सांगितले. ते जीडब्ल्यू मेडिकल फॅकलटी असोसिएटसमध्ये संचालक आहेत. बायडेन यांच्याकडे दोन जर्मन शेपर्ड कुत्रे आहेत. त्यातल्या. मेजरसोबत खेळत असताना ७८ वर्षीय बायडेन यांचा पाय घसरुन पडले.

आणखी वाचा- अण्वस्त्र शास्त्रज्ञाच्या हत्येमुळे इराण-इस्रायल संघर्ष पेटणार? बायडेन यांचा मार्गही खडतर

याच महिन्यात बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करुन, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. पुढच्यावर्षी २० जानेवारीला बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मागच्यावर्षी डिसेंबर २०१९ मध्ये ओ कॉननॉर यांनी बायडेन यांचा हेल्थ रेकॉर्ड जाहीर केला होता. बायडेन पूर्णपणे तंदुरुस्त असून अध्यक्षपदासाठी फिट असल्याचे त्यांनी सांगितले होते. बायडेन मद्यपान आणि तंबाखूच्या पदार्थाचे सेवन करत नाहीत. आठवडयाचे पाच दिवस ते नियमितपणे व्यायाम करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 3:35 pm

Web Title: joe biden suffers hairline fractures slipped while playing with his dog dmp 82
Next Stories
1 तीन-चार महिन्यांत देशातील नागरिकांना करोनावरील लस मिळेल – डॉ. हर्षवर्धन
2 रिक्षाच्या चाकात महिलेच्या गळयातील ओढणी अडकली आणि…
3 “मी एक लैला अन् माझे हजारो मजनू”; आरोप करणाऱ्या विरोधकांना ओवेसींचा टोला
Just Now!
X