News Flash

जो बायडेन ५० कोटी फायझर लशी करणार दान; G-7 बैठकीत करतील घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात करोना विषाणूचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जो बायडेन ५० कोटी फायझर लशी करणार दान (सौजन्य- AP)

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात करोना विषाणूचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिका प्रशासन करोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लशीचे ५० कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकन माध्यमांनी याचा खुलासा केला. तसेच अध्यक्ष जो बायडेन G-7 बैठकीत घोषणा करतील असे सांगितले.

जगातील बऱ्याच देशात लशीची कमतरता आहे. जो बायडेन निर्णयामुळे त्या देशांना मदत होईल. अमेरिकेत लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक लोकांना लशीचे दोन्ही डोस दिले आहेत. त्यानंतर तेथील करोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे.

हेही वाचा- लसीसाठी Cowin वर स्लॉट बुक करताना या चुका केल्या तर कायमचे व्हाल बॅन

अध्यक्ष जो बायडेन यांनी ब्रिटनमधील ७ देशांसोबत G-7 च्या बैठकीपूर्वी लस दान करण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा स्थानिक माध्यमांनी बायडेन यांना जगाला लस देण्याच्या धोरणा विषयी विचारले तेव्हा त्यांनी, लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगितले.

बायडेन ही घोषणा करण्यासाठी फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोएर्ला यांच्यासमवेत हजर राहण्याची शक्यता आहे. ही घोषणा अमेरिकेच्या हितासाठी नसून जगाच्या हितासाठी असेल, असेही सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 4:15 pm

Web Title: joe biden will donate 50 crore pfizer vaccines srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 मोदींना सत्तेतून खाली खेचलं पाहिजे: ममता बॅनर्जी
2 उत्तर कोरियातील हुकूमशहा किमचं वजन घटलं!; तब्येतीच्या चर्चांना उधाण
3 “तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला इशारा!
Just Now!
X