‘होम अलोन’ या सिनेमामुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते जॉर्न हर्ड यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. ‘होम अलोन’ या सिनेमात जॉर्न यांनी केविन मॅककॅलिस्टर या मुख्य पात्राच्या वडिलांची भूमिका वठवली होती. ‘होम अलोन’ हा सिनेमा संपूर्ण जगभरात नावाजला गेलेला सिनेमा म्हणून प्रसिद्ध आहे. आजही टिव्हीवर हा सिनेमा लावण्यात आला तरी तो बघणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

सेलिब्रिटी न्युज वेबसाइट ‘टीएमझेड’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील एका हॉटेलच्या रुममध्ये त्यांचा मृतदेह आढळला. सैंटा क्लॅरा मेडिकल टेस्ट ऑफिसने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही असे म्हटले आहे. या आठठवड्यात त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर ते हॉटेलमध्येच राहायला होते.

जॉर्न हर्ड यांनी अभिनय केलेले सिनेमे-

१९९० आलेला ‘होम अलोन’ या सिनेमाने हा अभिनेता घराघरात पोहोचला

१९७० पासून त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीला सुरूवात केली होती.

जॉर्न हर्ड यांनी ‘कटर्स वे’, ‘सीएचयूडी अॅण्ड ग्लॅडिएटर’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

१९९९ मध्ये टिव्ही सिरीज ‘द सोप्रानोज’मधील त्यांच्या उत्तम अभिनयाबद्दल जॉर्न हर्ड यांना अॅमी पुरस्कारही मिळाला होता.

२००४ मध्ये आलेला विनोदीपट ‘व्हाइट चिक्स’मध्ये जॉर्न हर्ड यांच्यासोबत काम केलेले मार्लोन वायांस यांनी इन्स्टग्रामवर त्यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत म्हटले की, ‘तो फार चांगला माणुस होता. त्याच्यासोबत अनेक चांगल्या आठवणी आहेत. एवढ्या चांगल्या अभिनेत्याचे जाणे खरंच दुःखद आहे.’