सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसवर उपचार शोधण्याठी सर्वत्र  शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.   कोविड-19 हा विषाणू श्वसनसंस्थेवर हल्ला करणाऱ्या कोरोनोव्हायरस या गटातील विषाणूंमध्ये समाविष्ट होतो. कोविड-19वर सध्या कोणतीही मान्यताप्राप्त लस, उपचार किंवा आजार बरा करणारा उपाय उपलब्ध नाही. मात्र,  जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन आणि बीएआरडीए यांनी नोव्हेल कोरोना व्हायरस लसीचे संशोधन व विकासासाठी 1 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम जाहीर केली आहे. कंपनी सप्टेंबर 2020 मध्ये व्हॅक्सिन कँडिडेटच्या फेज 1 ह्युमन क्लिनिकल स्टडीजला सुरुवात करण्याची अपेक्षा आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन अमेरिकेत नवीन लस निर्मिती क्षमता निर्माण करणार आणि जगभर लस उपलब्ध करण्यास मदत करण्यासाठी अमेरिकेबाहेर अतिरिक्त उत्पादन क्षमता वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन (NYSE: JNJ) (कंपनी) जानेवारी 2020 पासून ज्या कन्स्ट्रक्टवर काम करत आहे. त्यातून लीड कोविड-19 व्हॅक्सिन कँडिडेट निवडल्याची, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या जॅनसन फार्मास्युटिकल कंपनीज व बायोमेडिकल अॅडव्हान्स्ड रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (बीएआरडीए) यांच्यातील सध्याच्या भागीदारीचा लक्षणीय विस्तार केल्याची  आणि लसीचे 1 अब्जाहून अधिक डोस जगभर पुरवण्याच्या उद्देशाने कंपनीच्या उत्पादन क्षमतेमध्ये झपाट्याने वाढ करण्याची घोषणा कंपनीने आज केली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये लीड व्हॅक्सिन कँडिडेटच्या ह्युमन क्लिनिकल स्टडीजला सुरुवात केली जाईल आणि 2021 च्या सुरुवातीला आणीबाणीच्या वापरासाठी ऑथरायझेशनसाठी कोविड-19वरील लसीची पहिली बॅच उपलब्ध होऊ शकते, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

कंपनीने साथीच्या दरम्यान इमर्जन्सी वापरासाठी लोकांसाठी विना-नफा पद्धतीने किफायतशीर लस उपलब्ध करायचे ठरवले आहे. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलेक्स गॉर्स्की म्हणाले, जगावर आरोग्यविषयक संकट ओढवले आहे. कोविड-19 वरील लस जगभर व किफायतशीरपणे उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या मिळणाऱ्या लस अतिशय महागड्या आहेत.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे व्यवस्थापकीय संचालक, चीफ सायण्टिफिक ऑफिसर आणि कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष पॉल स्टॉफेल्स यांनी सांगितले की, आम्ही जानेवारीपासून ज्या कन्स्ट्रक्टवर काम करत आहोत त्यातून लीड व्हॅक्सिन कँडिडेट ओळखला आहे. आम्ही सप्टेंबर 2020 मध्ये फेज 1 ह्युमन क्लिनिकल ट्रायल सुरू करणार आहोत. या टेस्टिंगबरोबरच आम्ही जी जागतिक उत्पादन क्षमता वाढवणार आहोत त्यामुळे 2021 च्या सुरुवातीला इमर्जन्सी वापरासाठी लस तयार असेल, अशी अपेक्षा आहे.

जानेवारी 2020 मध्ये केली संशोधनास सुरुवात –

नवीन कोरोनाव्हायरस (कोविड-19) सिक्वेन्स उपलब्ध झाल्यानंतर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने जानेवारी 2020 मध्ये संभाव्य व्हॅक्सिन कँडिडेटसाठी संशोधनास सुरुवात केली. जॅनसनमधील संशोधन गटाने हार्वर्ड मेडिकल स्कूलचा भाग असलेल्या बेथ इस्रायल डीकॉनेस मेडिकल सेंटरच्या सहयोगाने, जॅनसन AdVac®️ तंत्रज्ञानाचा वापर करून विविध व्हॅक्सिन कँडिडेट कन्स्ट्रक्ट केले व त्यांची चाचणी केली.

विविध शैक्षणिक संस्थांतील शास्त्रज्ञांशी केलेल्या सहयोगाच्या माध्यमातून व्हॅक्सिन कन्स्ट्रक्टची चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये सर्वाधिक इम्युन रिस्पॉन्स निर्माण करण्याची सर्वाधिक शक्यता असणारे व्हॅक्सिन कन्स्ट्रक्ट प्रिक्लिनिकल टेस्टिंगमध्ये ओळखण्यात आले.या कामाच्या आधारे, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने लीड कोविड-19 व्हॅक्सिन कँडिडेटची (दोन बॅक-अपसह) निवड केली आहे, यानंतर उत्पादनाचे पहिले पाऊल टाकले जाणार आहे.