News Flash

‘जॉन्सन’च्या लशीस मान्यतेची शिफारस

अमेरिकेत ४.७० कोटी लोक म्हणजे १४ टक्के लोकांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वॉशिंग्टन : जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने तयार केलेल्या कोविड १९ प्रतिबंधासाठीच्या एक मात्रेच्या लशीची आपत्कालीन मान्यतेसाठी शिफारस क रण्यात आली  असून आतापर्यंतच्या कुठल्याही लशींपेक्षा ती परिणामकारक व वापरण्यास सोपी आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या सल्लागार समितीने या लशीच्या वापराची शिफारस केली असून जॉन्सन अँड जॉन्सनची  ही लस अमेरिकेता मान्यता मिळणारी अमेरिकेतील तिसरी लस ठरणार आहे. एकीकडे विषाणूचे उत्परिवर्तन चालू असताना वेगाने लस उपलब्ध करणे गरजेचे असून आतापर्यंत अमेरिकेत पाच लाख बळी गेले आहेत. जर अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन वापरासाठी जॉन्सन अँड जॉन्सन लशीला मान्यता दिली तर सोमवारीच लाखो मात्रा उपलब्ध करून देणे शक्य आहे.

अमेरिकेत ४.७० कोटी लोक म्हणजे १४ टक्के लोकांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. या लशी फायझर व मॉडर्नाच्या आहेत. त्यांना डिसेंबरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली होती. असे असले तरी अमेरिकेत लसीकरणाचा वेग मंद असून थंडीतील वादळांमुळे लसीकरणात अडथळे येत आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने म्हटले आहे,की मार्चपर्यंत आम्ही लशीच्या दोन कोटी मात्रा उपलब्ध करून देऊ. जूनपर्यंत हे प्रमाण दहा कोटीपर्यंत राहील. जॉन्सन अँड जॉन्सन लशीची एकच मात्रा पुरेशी असून ही लस रेफ्रिजरेटरमध्ये तीन महिने साठवून ठेवता येते. त्यामुळे ती इतर लशींपेक्षा वापरण्यास सोयीची आहे.

संदर्भ  225/FES4-US-VACCINE-SINGLE DOSE.txt)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 2:08 am

Web Title: johnson vaccine recommendation approved akp 94
Next Stories
1 इस्रोची २०२१ मधील पहिली मोहीम आज
2 रंजन गोगोई यांच्याविरोधात खटल्यास परवानगी नाही
3 आता खासगी रुग्णालयातही मिळणार करोनाची लस! किंमत ठरली, लवकरच घोषणा होण्याची शक्यता!
Just Now!
X