X
X

धार्मिक भावना दुखावल्यावरून पत्रकारास अटक

चुकीची बातमी देऊन समाजात तेढ पसरवल्याचा आरोप आहे.

एका भाषिक वृत्तपत्राच्या पत्रकारास धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि एका समुदायाच्या विरोधात चुकीची बातमी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. राजस्थानातील दौसा जिल्ह्य़ात एका घरावर ध्वज लावल्याबाबत ही बातमी होती. सदर घरावर पाकिस्तानी ध्वज लावला होता असा दावा बातमीत करण्यात आला होता, त्यामुळे समाजात नाराजी निर्माण झाली. पोलिसांनी सांगितले की, तो धार्मिक ध्वज होता. याप्रकरणी पत्रकार भुवनेश यादव व इतर तिघांवर अब्दुल खलील यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून. चुकीची बातमी देऊन समाजात तेढ पसरवल्याचा आरोप आहे. यादव नावाच्या पत्रकारास काल रात्री कलम १५३ ए  ( समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे) व कलम २९५ ए (हेतूत: द्वेषमूलक कृती करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. भादंविमधील एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप म्हणजे २९५ ए कलम आहे.

22
X