News Flash

पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची मेक्सिकोमध्ये हत्या

रिओडॉसने वाल्डेझ यांची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताला आपल्या संकेतस्थळावरून दुजोरा दिला आहे

| May 17, 2017 04:10 am

रिओडॉसने वाल्डेझ यांची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताला आपल्या संकेतस्थळावरून दुजोरा दिला आहे

अमली पदार्थाची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी याबाबतचे वृत्तांकन करण्यात हातखंडा असलेले ज्येष्ठ पत्रकार जेविएर वाल्डेझ यांची मेक्सिकोतील सिनाओला येथे हत्या करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांत हत्या करण्यात आलेले वाल्डेझ हे सहावे आणि रेजिना मार्टिनेझ पेरेझ यांच्यानंतर हत्या करण्यात आलेले दुसरे मोठे पत्रकार आहेत.सिनाओलाची राजधानी क्युलिअ‍ॅकन येथे सोमवारी दुपारी वाल्डेझ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. वाल्डेझ हे सहसंस्थापक असलेल्या रिओडॉस या प्रकाशनाच्या कार्यालयाजवळच ही हत्या करण्यात आली, असे सिनाओलातील सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.रिओडॉसने वाल्डेझ यांची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताला आपल्या संकेतस्थळावरून दुजोरा दिला आहे. कार्यालयापासून काही अंतरावरच बंदूकधाऱ्यांनी त्यांना अडविले. ला जॉर्नाडा या राष्ट्रीय वृत्तपत्राचे ते प्रतिनिधी होते त्यांना गाडीतून बाहेर खेचून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव करण्यात आल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.

वाल्डेझ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकार होते आणि अमली पदार्थाच्या व्यापारावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:40 am

Web Title: journalist javier valdez murdered in mexico
Next Stories
1 नितीशकुमार- लालूप्रसाद संबंधांत आणखी बिघाड
2 ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वाचकांची भूकंपग्रस्त नेपाळला मदत
3 वाढत्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये ३८ हजार लोकांचा मृत्यू
Just Now!
X