ब्रिटनचे ख्यातनाम पत्रकार व भारतातील माजी उच्चायुक्त जॉन फ्रीमन (वय ९९) यांचे निधन झाले. त्यांची कारकीर्द चतुरस्र होती. बीबीसीवर ते फेस टू फेस हा कार्यक्रम सादर करीत असत. भारतात १९६५ ते १९६८ dv09दरम्यान हॅरॉल्ड विल्सन यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत ते राजदूत होते. न्यू स्टेटसमन मासिकाचे ते संपादक होते तसेच मजूर पक्षाचे खासदार होते. अमेरिकेतही ते  राजदूत होते व लंडन विकएंड टेलिव्हिजनचे अध्यक्ष होते. मार्टिन ल्यूथर किंग व बट्राँड रसेल यांच्या मुलाखती त्यांनी त्यांच्या खास शैलीत घेतल्या होत्या. वॉटफर्ड येथून १९४५-५५ दरम्यान ते निवडून आले होते. १६ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पहिले भाषण केले, त्यावेळी जर्मनी शरण आलेला होता व जपानवर दोन अणुबाँब पडले होते. त्यावेळचे त्यांचे भाषण गाजले होते.