News Flash

सरबजितसिंगच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती

लाहोरमधील कोट लखपत कारागृहात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मरण पावलेला भारतीय कैदी सरबजितसिंग याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानातील न्यायालयाने एका न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे.

| May 18, 2013 12:36 pm

लाहोरमधील कोट लखपत कारागृहात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मरण पावलेला भारतीय कैदी सरबजितसिंग याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानातील न्यायालयाने एका न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उमर अता बंदियाल यांनी सरबजितसिंगच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्या. सय्यद अझहर अली अकबर नक्वी यांची नियुक्ती केली असून त्यांना आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मात्र त्यासाठी नक्वी यांना मुदत देण्यात आलेली नाही.
त्यापूर्वी पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री नजम सेठी यांनी मुख्य न्यायमूर्तीना पत्र लिहून सरबजितसिंगच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. गेल्या २६ एप्रिल रोजी पाच-सहा कैद्यांनी सरबजितसिंग याच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2013 12:36 pm

Web Title: judge appointed to probe sarabjits murder
टॅग : Sarabjit Singh
Next Stories
1 फिलिपाइन्समधील महापौरपदाच्या निवडणुकीत नाणेफेकीने कौल
2 नक्षलवाद्यांसह झालेल्या चकमकीत जवान शहीद
3 मुक्या, बहि-या, अनाथ मुलींवर जयपूरच्या निवासी शाळेतच बलात्कार
Just Now!
X