15 August 2020

News Flash

“भाजपाला विरोध केल्यास मारले जाल किंवा तुरुंगात जाल”

"भाजपाने न्याय व्यवस्थेलाही सोडले नाही"

Congress slams BJP

न्याय नकारला नाही तर उदध्वस्त करण्यात आला आहे, अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसने न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीप्रकरणासंदर्भात दिली आहे. दिल्लीमधील हिंसाचार प्रकरणी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान चिथावणीखोर विधाने करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, असा सवाल करत दिल्ली पोलिसांना फैलावर घेणाऱ्या न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यावरुन आता काँग्रेसने भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. ही सुनावणी संध्याकाळच्या सुमारास संपली त्यानंतर रात्री साडे अकरा पावणेबाराच्या सुमारास न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश आले. देशाच्या राष्ट्रपतींनी देशाच्या सरन्यायाधिशांशी चर्चा करुन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. एस. मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरिणाया उच्च न्यायलयात केल्याचे या आदेशात म्हटलं आहे. न्या. एस. मुरलीधर यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असंही यामध्ये म्हटलं आहे. बदली झाल्यामुळे न्या. मुरलीधर दिल्ली हिसांचार प्रकरणाची पुढील सुनावणी करणार नसल्याचे समजते. मात्र आता यावरुन राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच काँग्रेसने यावरुन थेट भाजपावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन न्या. मुरलीधर बातमीची लिंक शेअर करत भाजपाला टोला लगावला आहे. “भाजपाशी असहमत असाल तर तुम्हाला ठार केलं जाईल, बदली केली जाईल, बरखास्त केलं जाईल किंवा अटक केली जाईल. इथे न्याय व्यवस्थेलाही सोडले नाही. न्याय नकारला नाही तर उदध्वस्त करण्यात आला आहे,” असं काँग्रेसने म्हटलं आहे.

नक्की काय म्हणाले होते न्या. एस. मुरलीधर?

हर्ष मंदर यांनी दाखल केलेल्या याचिकेद्वारे दिल्ली पोलिसांच्या बेफिकिरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दंगलग्रस्त भागांमध्ये लष्कराला पाचारण करण्याची विनंतीही याचिकेद्वारे करण्यात आली. त्यावर सुनावणीदरम्यान १९८४ च्या नरसंहाराचा संदर्भ देत न्या. एस. मुरलीधर यांनी पोलिसांना धारेवर धरले.

कपिल मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा का नाही?

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांची वादग्रस्त चित्रफीतही न्यायाधीशांनी पाहिली. रविवारी दुपारी कपिल मिश्रा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मौजपूर-बाबरपूर भागात प्रक्षोभक विधाने केली होती. जाफराबाद येथील आंदोलकांना तीन दिवसांत हटवण्याची ‘सूचना’ त्यांनी पोलिसांना केली होती. ही चित्रफीत पाहून न्या. मुरलीधर यांनी मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा केली होती. त्यावर ही चित्रफीत आपण पाहिली नसल्याचे उत्तर न्यायालयात उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. त्यावर, न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांनी ती पाहिली आहे. वृत्तवाहिन्यांवर दाखवली गेली आहे. तरीही तुम्ही चित्रफीत पाहिली नाही? अशी विचारणा न्यायाधीशांनी केली होती.

मिश्राच नाही या नेत्यांवरही गुन्हे दाखल करा

उच्च न्यायालयाने कपिल मिश्राच नव्हे तर, केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर, परवेश वर्मा आणि अभय वर्मा यांच्या प्रक्षोभक विधानांची चित्रफीतही पाहिली. प्रक्षोभक भाषणे करून लोकांना भडकवणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे न्या. मुरलीधरन यांनी सुनावले.

गुन्हे नोंदवण्याचे निर्देश

जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवता, मग प्रक्षोभक विधाने केल्याबद्दल का कारवाई केली नाही? आम्ही १० डिसेंबरपासून अशा विधानांवर नजर ठेवून आहोत. गुन्हा घडला आहे हे देखील तुम्ही मान्य करत नाही का? असे सवाल करत तातडीने गुन्हे नोंदवण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश न्या. मुरलीधर यांनी दिले. फक्त या चार चित्रफितीच नव्हे तर या प्रकरणाशी संबंधित सर्व चित्रफितींची दखल पोलीस आयुक्तांनी घ्यावी. हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे न्या. मुरलीधर यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:16 pm

Web Title: judiciary is not spared congress slams bjp over transfer of justice s muralidhar scsg 91
Next Stories
1 पॉर्न साईट्सपासून दूर राहण्यासाठी सरकारच घेणार विद्यार्थ्यांची शाळा
2 मध्यरात्री न्यायाधिशांची बदली, हा प्रकार लाजिरवाणा : प्रियंका गांधी
3 माहिती युद्ध विसरा, आम्ही कुठे वार केला हे पाकिस्तानला चांगलं ठाऊक आहे – एअर फोर्स प्रमुख
Just Now!
X