News Flash

टुंडाला फाशी द्या; कुटुंबीयांची मागणी

कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार दहशतवादी अब्दुल करीम तुंडा याच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी तुंडाला फाशी देण्याची मागणी केली आहे.

| August 18, 2013 12:35 pm

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी तुंडाला फाशी देण्याची मागणी केली आहे. टुंडा याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काल शनिवार अटक केली आहे.
 दोन दशकांपूर्वीच स्थानिक पोलिसांनी टुंडाच्या घरातील सर्व वस्तूंचा लिलाव केला होता. उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात टुंडा राहत होता. याघरातील अगदी खिडक्यांच्या लोखंडी जाळ्या आणि दरवाजाचा सुद्धा लिलाव करण्यात आला होता.
टुंडाच्या पहिल्या पत्नीची बहीण ताहीरा बेगम, सध्या आपल्या कुटुंबासोबत भारतात राहते आहे. ती म्हणाली, अनेक वर्षे आम्हाला त्याच्या चौकशीता त्रास भोगावा लागला. टुंडा आता जिवंत नाही असे आम्ही गृहीत धरले होते. आता त्याचे तोंडसुद्धा बघण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्याला फाशीच झाली पाहिजे.
टुंडाने भारतातून पळ काढल्यापासून त्याच्या झरीना, मुमताज या त्याच्या दोनही पत्नी आणि सहा मुले यांचासुद्धा काही थांगपत्ता नाही. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 12:35 pm

Web Title: just hang to tunda we dont want to see his face again tunda family
Next Stories
1 चीनमधील पुरात २९ ठार
2 भारतीय वंशाचे विजय सिंग यांना पर्यावरणातील सर्वोच्च पुरस्कार
3 घुसखोरांच्या हल्ल्यात १० ठार
Just Now!
X